-
अमेरिकन अंतराळ संस्थेच्या मंगळ मोहिमेतील पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. भारतीय वेळेनुसार १९ फेब्रवारी रोजी रात्री अडीच वाजता नासाचं हे यान मंगळावर उतरलं. या यानाच्या मदतीने मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही यासंदर्भात संसोधन करण्यात येणार आहे. तसेच मानवाला मंगळावर पाठवण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे यासंदर्भातही महत्वाचं संशोधन या मोहिमेअंतर्गत केलं जाणार आहे. (सर्व फोटो नासाच्या वेबसाईटवरुन साभार)
-
नासाची ही मोहीम अनेक अर्थांनी विशेष असली तरी हे यान ज्या ठिकाणी उतरलं आहे ती जागा सुद्धा तितकीच खास आहे. हे यान मंगळावर कुठे उतरवण्यात यावं यासंदर्भात तब्बल पाच वर्षे संशोधन सुरु होतं त्यानंतर हे यान उतरवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. या जागेचं नाव जीझीरो क्रेटर असं आहे.
-
७० कोटी डॉलर्स खर्च करुन पाठवण्यात आलेल्या या पर्सिव्हिअरन्स रोव्हरला जीझीरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात उतरवण्यामागे एक विशेष कारण आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार वैज्ञानिकांनी या ठिकाणी फार पूर्वी एका नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश होता अशी शक्यता व्यक्त केलीय.
-
जगभरातील वैज्ञानिक आणि नासामधील वैज्ञानिकांनी मंगळावरील एकूण ६० ठिकाणांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर जीझीरो क्रेटर या जागेची निवड केली आहे. नासाचं पर्सिव्हिअरन्स रोव्हर नक्की कुठे उतरवायचं यासंदर्भात तब्बल पाच वर्षे अभ्यास करण्यात आला. प्रत्येक जागा ही काही ना काही कारणाने विशेष होती. मात्र या सर्वांमध्ये जीझीरो क्रेटरने बाजी मारली.
-
जवळजवळ ३५० कोटी वर्षांपूर्वी या प्रदेशामधून नदीचा प्रवाह वाहत होता असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. या ठिकाणी एक तळंही असल्याचं सांगण्यात येतं. या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या पुराव्यांवरुन आणि पृष्ठभागाच्या रचनेवरुन येथे काही शे कोटी वर्षांपूर्वी पाण्याचा प्रवाह होता असं सांगण्यात येत आहे.
-
मंगळावर अनेक हजार वर्षांपासून ओला व सुका कालावधी अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतं. यापैकी ओल्या कालावधीमध्ये जीझीरो क्रेटरच्या परिसरात सूक्ष्मजीव रहायचे असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा असेल तर खरोखरच या ठिकाणी जीवसृष्टीचे पुरावे आढळतील असं सांगितलं जात आहे.
-
वैज्ञानिक आता या ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी जीझीरो क्रेटरची मदत घेणार आहे. हा प्रदेश कसा आणि कशापासून निर्माण झाला, त्यामध्ये जीवसृष्टीचे काही पुरावे आढळतात का या सर्वाची चाचपणी येथील दगड आणि मातीचे परिक्षण करुन केली जाणार आहे.
-
जीझीरो क्रेटर हा ४५ किमी व्यास असणारा मंगळावरील प्रदेश आहे. हा प्रदेश मंगळावरील इसिडिस प्लॅनिटिया या मोठ्या प्रदेशाचा भाग आहे. मंगळाच्या विषुववृत्तीय प्रदेशापासून हा प्रदेश अगदी जवळ आहे. नासाच्या क्युरॉसिटी या यानाने ज्या गाली क्रेटरजवळ लॅण्डींग केलं आहे तेथून ३ हजार ७०० किमी दूर पर्सिव्हिअरन्स रोव्हरची ही लॅण्डींग साईट आहे.
-
जीझीरो क्रेटरमध्ये कोट्यावधी वर्षांपूर्वी एक मोठी उल्का मंगळाच्या पृष्ठभागावर आदळली होती. त्यामुळे जो मोठा खड्डा निर्माण झाला तोच हा जीझीरो क्रेटर.
-
उल्का आदळण्याच्या या घटनेला इसिडिस इम्पॅक्ट असं म्हणतात ज्यामुळे १२०० किलोमीटर व्यास असणारा खड्डा निर्माण झाला. त्यानंतरही या भागात अनेक लहानमोठे उल्कापात होत राहिले.
-
या सततच्या उल्कापातामुळे येथील खडकाची रचना पूर्णपणे बदलली. मात्र याच बदलांमुळे जीवसृष्टीला पोषक वातारवण निर्माण झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. त्यातच या ठिकाणी फार पूर्वी नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश होता असंही सांगण्यात येतं. द मार्स रिकनसेन्स ऑर्बिटर असणाऱ्या सीआरआयएसएमने या ठिकाणी सापडलेले काही मातीचे नमुने हे पाण्याची अंश असेल तरच तयार होऊ शकतात अशा पद्धतीचे असल्याचं संशोधनानंतर म्हटलं होतं.
-
पृथ्वीवर अशाप्रकारच्या मातीचे नमुने मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ सापडतात. या ठिकाणी दगडांमध्ये राहणारे सूक्ष्मजीव आढळून आळे आहेत. त्यामुळे मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी जीझीरो क्रेटर ही एकदम उत्तम जागा असल्याचे सांगितले जात आहे.
-
पृथ्वीवर अशाप्रकारच्या मातीचे नमुने मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ सापडतात. या ठिकाणी दगडांमध्ये राहणारे सूक्ष्मजीव आढळून आळे आहेत. त्यामुळे मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी जीझीरो क्रेटर ही एकदम उत्तम जागा असल्याचे सांगितले जात आहे.
-
नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
-
मानवाला मंगळावर कसं पाठवता येईल यासंदर्भातील संशोधन पर्सिव्हिअरन्स मोहिमेच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मंगळाच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्मितीसाठी काय करता येईल यासंदर्भातही संशोधन या मोहिमेमध्ये केलं जाणार आहे. पर्सिव्हिअरन्स रोव्हरवर मॉक्सील नावाचे एक यंत्र बसवण्यात आलं असून त्याच्या माध्यमातून मंगळाच्या वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्माण करता येईल का यासंदर्भातील चाचणी करण्यात येणार आहे.
-
‘पर्सिव्हियरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल. ज्यामुळे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग खुला होईल,’ असं नासानं म्हटलं आहे.

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो