-
मागील काही दिवसांपासून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामधील सहभागामुळे चर्चेत असणारे विधानपरिषदेचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. मात्र या चर्चेचं कारण ठरलं आहे त्यांचा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा हा वर दिसणारा फोटो.
-
झालं असं की काल म्हणजेच रविवारी (१४ मार्च २०२१ रोजी) फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यामध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी पडळकर आणि काही सहकारी गेले. याचसंदर्भातील फोटो पडळकर यांनी आपल्या सोशल नेटवर्किंगर पेजेसवरुन पोस्ट केला. मात्र त्यांनी या फोटोला कॅप्शन देताना देवेंद्र यांचा उल्लेख शेतकऱ्यांचे हृदयसम्राट असा केला. अनेकांना हा उल्लेख खटकला आणि त्यावरुन पडळकर आता ट्रोल होत आहेत.
-
शेतकऱ्यांचे हृदयसम्राट?, असा प्रश्न एकाने फेसबुक पोस्टवर कमेंट करुन विचारलाय.
-
पुढे पुढे करु नका असा सल्ला एकाने पडळकरांना दिलाय.
-
पडळकर यांनी ट्विटरवरही फडणवीस यांना टॅग करुन हा फोटो पोस्ट केलाय. यावरही अनेकांनी कमेंट करुन फडणवीस शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे हृदयसम्राट कसे असा प्रश्न उपस्थित केलाय. तर अनेकांनी पळकरांना ट्रोल केलं आहे.
-
तरूणाईच्या गळ्यातील ताईत वगैरे पण लिहायला हवं होतं असा खोचक टोला एकाने लगावला आहे
-
एकाने पडळकरांच्या शर्टावरुन कमेंट केलीय.
-
शेतकऱ्यांचे हृदयसम्राट आहेत मग दिल्लीतील शेतकऱ्यांना का भेटायला गेले नाहीत?, असा प्रश्न एकाने विचारलाय.
-
फडणवीस यांना अशा लोकांची भीती वाटत असल्याचं मत एकाने नोंदवलं आहे
-
एकजण जीफ इमेजमधून व्यक्त झालाय
-
फडणवीस शेतकऱ्यांचे हृदयसम्राट कधी झाले या प्रश्नाला एकाने उत्तर दिलं आहे
-
स्वागत करुन काय झालं?, असा प्रश्न एकाने विचारलाय
-
एकाने या वक्तव्यावरुन भाजपालाच येड्यांची जत्रा म्हटलं आहे.
-
एकाने पडळकरांना कायम स्वरुपी भावी मुख्यमंत्री असं म्हटलं आहे
-
टाळ्या वाजवण्याचा जीफ शेअर करत एकाने मत नोंदवलं आहे.
-
फडणवीस शेतकऱ्यांचे हृदयसम्राट आहेत हा मस्त जोक होता असं काहींनी म्हटलं आहे.
-
एकही शेतकरी फोटोत दिसत नसल्याचा टोलाही एकाने लगावला आहे
-
मला आमदार करणारे असाही फडणवीस यांचा उल्लेख करता आला असता असा टोला एकाने लगावलाय.
-
काहींनी नुसता स्मायलीजला पाऊस पाडलाय
-
फडणवीस यांना शेतकऱ्यांचे हृदयसम्राट म्हणणे ही केविलवाणी धडपड असल्याचेही एकाने म्हटलं आहे.
-
तर एकाने असेच काही जोक पाठवा अशी विनंती पडळकरांकडे केलीय.

IND vs ENG: ऋषभ पंतचा अतिदुर्मीळ विक्रम! १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा फक्त दुसरा खेळाडू