-
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन. दोन आत्म्यांचं मिलनं. सप्तपदींसोबत या बंधनात साता जन्माची गाठ बांधली जाते. दोन जीव पती पत्नीच्या नात्यात बांधले जातात.
-
लग्न सोहळ्यामधील विधींनाही तसचं महत्व आहे. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मुलगा तिला सौभाग्याचं लेणं बहाल करतो.
-
मंगळसूत्र हा केवळ एक दागिना किंवा अलंकार नसून मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जातं. मंगळसूत्रातील दोन दोरे म्हणजे पती पत्नीचं बंधन.
-
आतापर्यंत आपण केवळ विवाहित स्त्रीयांना मंगळसूत्र घातल्याचं पाहिलं असले. किंवा विवाह सोहळ्यात नवरा मुलगा नवरीला मंगळसूत्र घालताना पाहिलं असले.
-
मात्र एक असा लग्नसोहळा सध्या चर्चेत आहे. ज्यात चक्क एका मुलीनेच पतीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आहे.
-
शार्दुल कदम या तरुणाने एक धाडसी निर्णय घेतला आहे. समाजात खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी फक्त स्त्रीयांनीच का मंगळसूत्र घालावं असं म्हणत त्याने लग्नबंधनात अडकत असताना स्वत: मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दूलच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय.
-
शार्दुलने लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. ज्यात त्याने मंगळसूत्र घालण्याच्या निर्णयाचा खुलासा केला आहे. "मंगल शब्दाचा अर्थ शुभ आणि सूत्र म्हणजे धागा – मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्र म्हणजे आत्मा एक होणारा शुभ धागा. मंगळसूत्राकडे मात्र समाजाकडून वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. फक्त स्त्रीनेच मंगळसूत्र घालावं हा समाजाचा नियम आहे.पण मला हे खटकतं. मला वाटतं मी माझ्या पत्नीवरचं प्रेम दर्शवण्यासाठी मंगळसूत्र घालू शकत नाही का ? आमच्या नात्याचं प्रतिक म्हणून मी हा धागा का घालू नये"असं शार्दूल म्हणाला आहे.
-
शार्दूलने पत्नीच्या गळ्यात काळ्या मण्यांचं दोन डोरली असलेलं मंगळसूत्र घातलं. तर याचं वेळी तिने देखील शार्दूलच्या गळ्यात काळ्या मण्यांच्या माळेत एक गोल चांदीच पेंडन्ट असलेलं मंगळसूत्र घातलं.
-
तसचं त्याने अलिकडे फॅशन असलेलं हातातील ब्रिसलेट मंगळसूत्रही घातलं आहे. पुरुषांचं हे खास मंगळसूत्र डिझाईन करण्याबद्दल त्याने सायली मराठे आणि आद्या या ज्वेलरी ब्रॅण्डचे आभार मानले आहेत.
-
हे मंगळसूत्र घातल्यानतंर काही पुरुषांकडून टीका होणार याची कल्पना होती असं शार्दूल म्हणाला.
-
शार्दूलने लैगिंक समानतेची शपथ घेतल्याचं म्हंटलं आहे. पण मी किमान माझ्या आयुष्यात तरी लैगिंक समानता आणण्याचा प्रयत्न करीन असं तो म्हणाला आहे.
-
शार्दूलने त्याच्या कुटुंबातील तसचं त्याच्या आयुष्यात जवळच्या सर्व महिलांचे आभार मानले आहेत. घरातील आई, बहिणीपासून प्राध्यापकांचे त्याने आभार मानले.
-
तसचं या निर्णयाला पाठिंबा दिल्या बद्दल त्याने पालकांचे, सासरच्या मंडळींचे आणि पत्नीचेही आभार मानले आहेत.
-
शार्दूलने समाजाची भीती न बाळगता. लैगिंक समानतेसाठी एक मोठं पाऊल उचलंलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – शार्दुल कदम / इन्स्टाग्राम)

CDS Anil Chauhan : पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल CDS अनिल चौहान यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “म्हणून आपण रणनीतीमध्ये…”