-
मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये फ्रण्टफूटवर खेळणारे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी खरोखरच क्रिकेटच्या मैदानात दिसले.
-
गुरुवारी मुंबईमधील दादर येथे फडणवीस यांच्यात दडलेल्या क्रिकेटपटूची झलक पहायला मिळाली ती पुरंदरे मैदानावर.
-
फडणवीस थेट बॅट हाती घेऊन मैदानात उतरण्यासाठी निमित्त होतं, भाजपा वडाळा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचं.
-
दादर पूर्वील पुरंदरे मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेचं उदघाटन फडणीस यांच्या हस्ते झालं.
-
यावेळी मंचावर फडणवीस यांना विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं.
-
त्यानंतर फडणवीस यांनी मैदानामध्ये जाऊन सहभागी संघातील क्रिकेटपटुंची भेट घेतली.
-
फडणवीस यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी खेळाडूंनाही गर्दी केल्याचं पहायला मिळालं.
-
क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेल्या फडणवीस यांना बॅट हातात घेऊन काही चेंडू खेळून पाहण्याचा मोह आवरला नाही. "यावेळी काही फटके खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला," असं म्हणत फडणवीस यांनीच काही फोटो स्वत:च्या फेसबुक पेजवरुन शेअर केलेत.
-
मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं. गोलंदाजीपेक्षा फलंदाजी अधिक आवडते, असं या फटकेबाजीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांना सांगितलं.
-
"गोलंदाजीचाही आनंद वेगळा आहे. गोलंदाजी करताना ती बॉडीलाईन नसते. थेट स्टंम्पसवर, शॉर्टपीच नसलेला चेंडू टाकतो. अर्थात गुगलीही आवडते," अशी अराजकीय शाब्दिक फटकेबाजीही फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
-
फडणवीस यांनी मोजक्या चेंडूंवर चांगली फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. पुल शॉर्टपासून थेट ऑफ साईडचा हवेत शॉर्ट मार्ण्यापर्यंतचे अनेक फटके खेळत फडणवीस यांनी फलंदाजीचा आनंद लुटला. त्यांचं क्रिकेट खेळणं हे दिवसभर चर्चेचा विषय ठरलं. (सर्व फोटो: facebook/devendra.fadnavis वरुन साभार )

बापरे! पृथ्वीवरचा रियल नागराज! २० फूट साप माणसासारखा उभा राहिला; VIDEO पाहून सर्वांनाच भरेल धडकी