-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी म्हणजेच ७ जुलै २०२१ रोजी विस्तार झाला.
-
या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पियुष गोयल यांच्याकडील रेल्वे खात्याचा कारभार काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आला.
-
माहिती आणि प्राद्योगिक मंत्रालयाची जबाबदारीही अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आली आहे.
-
नव्यानेच मंत्रीमंडळामध्ये संधी देण्यात आलेल्या ३६ मंत्र्यांपैकी एक असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांचा सीव्ही आणि शैक्षणिक पात्रता तसेच कामाचा अनुभव या गोष्टींसदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
-
माजी आयएएस अधिकारी असणारे अश्विनी वैष्णव हे उद्योजकही होते आणि नंतर राज्यसभेचे खासदार झाले. त्यानंतर आता त्यांनी थेट मंत्रीपदापर्यंत झेप घेतली आहे.
-
मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये प्रशासकीय, कॉर्पोरेट तसेच शैक्षणिक दृष्ट्या सर्वात दमदार सीव्ही असणारा मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव यांची ओळख त्यांनी काम हाती घेण्याआधीच सांगितली जाऊ लागलीय.
-
अश्विनी वैष्णव यांचा थक्क करणारा हा प्रवास आपण या गॅलरीमधून जाणून घेऊयात…
-
तांत्रिक गोष्टींमध्ये विशेष आवड असणारे ५० वर्षीय अश्विनी वैष्णव हे मोदी सरकारमधील फार मोजक्या नेत्यांपैकी आहेत ज्यांना खासगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या पदावर काम करण्याचा अनुभव आहे.
-
करोना कालावधीमधील अनेक सरकारी धोरणं ठरवण्यामध्ये अश्विनी वैष्णव यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं सांगण्यात येतं.
-
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळामध्ये अश्विनी वैष्णव हे उपसचिव होते.
-
वाजपेयी पंतप्रधान असताना अश्विनी वैष्णव यांनी पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप मॉडेल उभारण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.
-
वाजपेयी यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर अश्विनी वैष्णव हे त्यांचे खासगी सचिव म्हणून काम करु लागले.
-
अश्विनी हे मूळचे राजस्थानचे आहेत. १९९९ साली आलेल्या चक्रीवादळामध्ये आपल्या ठोस निर्णयांमुळे वैष्णव पहिल्यांदा चर्चेत आले.
-
त्यावेळी अश्विनी हे तरुण आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अमेरिकन नौसेनेच्या वेबसाईटच्या मदतीने येणाऱ्या चक्रीवादळावर नजर ठेवली आणि त्यावेळी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
-
अश्विनी यांच्या ठोस भूमिकांमागील कारण आहे त्यांची शैक्षणिक पात्रता. अश्विनी हे जोधपूर विद्यापिठामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार या विषायांमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत.
-
त्याचबरोबर अश्विनी यांनी आयआयटी कानपूरमधून औद्योगिक व्यवस्थापनामध्ये एमटेक केलं आहे.
-
अमेरिकेतील व्हार्टन विद्यापिठामधून २००८ साली अश्विनी यांनी अर्थ आणि राजकारण विषय घेऊन एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
अश्विनी वैष्णव यांनी सिव्हील सर्व्हिसेसमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. २०१० मध्ये ते सिव्हील सर्व्हिसेसमधून बाहेर पडले.
-
त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण आशियामधील जीई ट्रान्सपोर्टेशन या कंपनीमध्ये व्यवस्थापकीय निर्देशक म्हणून काम केलं.
-
तसेच अश्विनी हे सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अर्बन इन्फ्रास्टक्चर स्ट्रॅटर्जी विभागाचे प्रमुख तसेच व्हिपी सुद्धा होता.
-
२०१२ साली त्यांनी कॉर्पोरेटमधून निवृत्ती घेत थ्री टी ऑटो लॉजिस्टीक प्रयव्हेट लिमिटेड आणि वी जी ऑटो कम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या गुजरातमध्ये सुरु केल्या.
-
इथेच २०१७ साली अश्विनी यांनी इतर उद्योजकांसोबत एकत्र येत एक स्टार्टअप कंपनी सुरु केली.
-
या कंपनीच्या अंतर्गत अश्विनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओदिशामधील आर्यन ऑक्साइडच्या प्लेट बनवणारी एक कंपनी विकत घेतली.
-
अश्विनी यांच्यासोबत १९९४ च्या आयएएसच्या तुकडीत असणारे त्यांचे सहकारी सांगतात की अश्विनी एकदम चमकदार कमागिरी करणारा सहकारी होता. मात्र हुशारी असली तरी ते कायमच अगदी साधेपणाने वावरायचे.
-
१९९४ च्या आयएएसच्या तुकडीचे अधिकारी असणारे अश्विनी हे त्या बॅचमध्ये भारतातून म्हणजेच ऑल इंडिया रँकिंगमध्ये २७ वे आले होते.
-
अश्विनी यांचे बॅचमेट आणि ओडिशामधील निवारा आणि शहर विकास विभागाचे सचिव असणारे जी. मथी वथानन यांनी अश्विनी हे फार सतर्क राहणारी, सर्व बाजुंनी एखाद्या गोष्टीचा विचार करणारी व्यक्ती आहे. ते स्वत: कायम उत्साही असतात आणि आपल्या सहकाऱ्यांनाही उत्साही ठेवतात असं वथानन म्हणाले.
-
अश्विनी हे कलकटमधील बालासोरचे ते जिल्हाधिकारीही राहिले आहेत.
-
अश्विनी यांच्या प्रतिभेची जाण ही राजकारण्यांनाही होती हे त्यांना राज्यसभेवर पाठवताना झालेल्या गोंधळामधून दिसून येतं.
-
झालं असं की ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बीजू जनता दलचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र नंतर भाजपाने जून २०१९ मध्ये सर्वोच्च सदनामध्ये अश्विनी यांना पाठवण्यासाठी समर्थन दिलं. त्यावेळी राज्यामधील सत्ताधारी पक्षाला एक सदस्य उच्च सभागृहात पाठवण्याची परवानगी होती.
-
त्यामुळेच बीजू जनता दलने आपली उमेदवारी कायम ठेवत अश्विनी यांना राज्यसभेवर पाठवलं ज्याला भाजपाने समर्थन दिलं.
-
अश्विनी हे राज्यसभेचे नेते असले तरी ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
-
माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी (८ जुलै २०२१ रोजी) पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली.
-
खासगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणारे अश्विनी हे सध्याच्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत.
-
अश्विनी यांचा सीव्ही म्हणून हा फोटो व्हायरल होतोय.
-
अश्विनी यांच्यासारख्या नेत्यामुळे रेल्वे मंत्रालय कात टाकणार अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केलीय.
-
अश्विनी यांच्या वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्यात. (सर्व फोटो, ट्विटर आणि फेसबुकवरुन साभार)

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”