-
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एका लहान मुलीसोबत चर्चा करतानाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर बुधवार सायंकाळपासून व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या मुलीने मोदींना भेटण्याचा हट्टच केला होता.
-
पंतप्रधान मोदी एका फोटोमध्ये हातवारे करुन या मुलीला काहीतरी समजावून सांगताना दिसत असून फोटोत ही मुलगी खळखळून हसताना दिसतेय. मुलीने केलेल्या हट्टापुढे तिच्या वडिलांचं काहीच चाललं नाही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे यासंदर्भात रितरस इमेल केला आणि भेटीची वेळ मागितली असता मोदींनी या मुलीला भेटण्यासाठी बोलवलं. याच भेटीदरम्यानचे हे फोटो आहेत.
-
मात्र हे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर ही मुलगी आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर मोदींसोबतच्या या फोटोत दिसणारी ही मुलगी महाराष्ट्रातील भाजपा खासदाराची मुलगी आहे.
-
महाराष्ट्रातील अहमदनगरमधील खासदार सुजय विखे पाटील यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीमध्ये सहकुटुंब जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली. कोविड काळात सरकारने केलेल्या विविध उपाययोजना आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबद्दल आपण यावेळी पंतप्रधानांचे आभार मानल्याचे सुजय यांनी सांगितलं आहे. यावेळी भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय यांची पत्नी धनश्री देखील उपस्थित होते.
-
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सुजय यांची मुलगी अनिषा हिच्यासोबतही दिलखुलासपणे संवाद साधला.
-
हे फोटो सुजय विखे पाटील यांनीच ट्विटरवरुन शेअर केले आहेत. (सर्व फोटो सुजय विखे-पाटील यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन साभार)

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…