-
हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात एक व्हायरल व्हिडीओ सुद्धा तुम्हाला रातोरात स्टार बनवू शकतो. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे पॅराग्लायडिंग मॅन म्हणून चर्चेत आलेला ‘लॅंड करा दे’ असं ओरडणारा मुलगा…आज तो लाखोंमध्ये कमवतोय. वाचा सविस्तर…
-
उत्तर प्रदेशमधल्या बांदा इथे राहणारा विपिन कुमार साहू याच्याबाबतीतही अगदी असंच घडलंय. मनालीच्या एका ट्रिपने विपिनचं नशीबच बदलून गेलंय आण तो एका रात्रीत सेलिब्रिटी बनलाय.
-
हल्ली तर तो आता टीव्ही शोजपासून ते अगदी वेगवेगळ्या म्युझिक अल्बममध्ये झळकताना दिसतोय. सोबत तो आता उद्योजक सुद्धा बनलाय.
-
आम्ही ज्या मुलाबद्दल तुम्हाला सांगतोय तो २०१९ मध्ये चर्चेत आलेला पॅराग्लायडिंग करताना जोरात ‘लॅंड करा दे’ असं ओरडणारा तो मुलगा आहे.
-
विपिन कुमार साहूला ऍगोराफोबिया (उंचीची भीती) असताना सुद्धा त्याच्या मित्रांनी त्याला पॅराग्लायडिंग करण्यासाठी भाग पाडलं होतं.
-
सुरूवातीला विपिनने याला नकार दिला होता. पण मग ट्रोलिंगच्या भीतीने विपिनने पॅराग्लायडिंगसाठी होकार दिला. त्यानंतर जे काही घडलं ते पाहून सारेच जण हैराण झाले.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये विपिन पॅराग्लायडिंग करताना तो पूर्णपणे घाबरूने गेला होता आणि डोळे बंद करत ‘जग्गा भाई लॅंड करा दो…मुझे लॅंड करा दो… ‘ असं जोरजोरात ओरडला होता.
-
मनाली ट्रीपवरून रूममध्ये गेल्यानंतर त्याने जेव्हा सुरूवातीला व्हिडीओ पाहिला तेव्हा तो व्हिडीओ कुठेच न शेअर करण्याचा निर्णय त्याने घेतला होता.
-
मनाली ट्रिपनंतर विपिनच्या छोट्या भावाने तो व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केला होता. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला.
-
त्यानंतर या व्हिडीओवर वेगवेगळ्या मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला. त्यानंतर विपिन कितीतरी दिवस घराबाहेर पडलाच नाही. त्यावेळी तो जिथे जिथे जात होता, तिथे प्रत्येक ठिकाणी त्याला ट्रोल केलं जात होतं.
-
अखेर चार पाच दिवसानंतर विपिनने घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्याचं नशीबच बदलून गेलं.
-
विपिन कुमार साहूचा टाईल्सचा व्यवसाय आहे.. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
-
काही लोक तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पॅराग्लायडिंग करणाऱ्या मुलाकडू टाईल्स विकत घेतल्या आहेत, हे दाखवण्यासाठी त्याच्याकडून टाईल्स घेऊन जाऊ लागले.
-
सोशल मीडियावर विपिनचा व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी प्रत्येक महिन्याला तो जवळपास १० ते १२ लाख रूपयांचा व्यवसाय करत होता.
-
पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा हाच व्यवसाय १५ ते २० लाखांपर्यंत पोहोचला.
-
त्यानंतर त्याने आणखी एक-दोन व्यवसाय नव्याने सुरू केले. हळुहळु त्याने एक जीमचा व्यवसाय देखील सुरू केला.
-
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विपिनचं नशीब पूर्णपणे पालटून गेलं. त्याला कलर्स टीव्हीच्या एका शोमध्ये देखील आमंत्रित करण्यात आलं होतं.
-
याशिवाय हॉटस्टारवर एका वेब सीरिजसाठी देखील त्याला ऑफर मिळाली. सोबतच एका म्युझिक कंपनीने विपिनला अप्रोच केलंय. हा म्युझिक अल्बम लवकरच रिलीज करण्यात येणार आहे.
-
विपिन कुमार साहूचे स्वतःचे YouTube चॅनल देखील आहे. व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी त्याचे ८० ते ९० सबस्क्राइबर होते.
-
पण त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सबस्क्राइबर १४ हजारांवर पोहोचले, नंतर ३५ हजार आणि आता १.३१ लाख इतके झाले आहेत.
-
सुरुवातीला त्याला व्हिडीओच्या कॉपीराइटबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी त्याचा व्हिडीओ अपलोड केला त्या सर्वांनी पैसे कमवले.
-
विपिन कुमार साहू याच्या ‘लॅंड करा दे’ व्हिडीओची कमाई सुमारे १५ ते १७ लाख रुपये होती.
-
परंतु त्याला फक्त ६ ते ७ लाख रुपये मिळाले.
-
त्यानंतर एका कंपनीने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्या व्हिडीओचे कॉपीराइट घेतले.
-
आज त्याला या व्हिडीओमधून १७ लाखांची कमाई होतेय. (ALL PHOTOS : vipinkumar__official )

PBKS vs MI Qualifier 2 Live: मुंबई-पंजाब सामना सुरू होण्यात मोठा व्यत्यय, पंचांनी दिलेल्या वेळेतही सामन्याला सुरूवात नाहीच