-
भारत आणि पाकिस्तानचे संबंध फारसे चांगले नाहीत.
-
मात्र तरी या दोन देशांमध्ये आणखी एक नातं आहे आणि हे नातं प्रेमाचं आहे.
-
महत्वाचं म्हणजे हे प्रेमाचं नातं एका लेस्बियन जोडप्याचं आहे.
-
होय. या लेस्बियन जोडप्यांच्या प्रेमात ना धर्म आला, ना लिंग, ना देश आणि नाही देशाच्या सीमा.
-
या जोडप्याचं नाव आहे सुफी मलिक आणि अंजली चक्र.
-
या दोघींची प्रेमकहानी देखील तेवढीच रंजक आहे.
-
सुफी मलिक आणि अंजली चक्र यांची पहिली भेट कॅलिफोर्नियातील टम्बलरवर झाली.
-
अंजली एक इव्हेंट प्लॅनर आहे.
-
तर, सुफी मलिक एक कलाकार आहे.
-
दोघींची या नात्यात येण्याच्या ७ वर्षांपूर्वी ऑनलाइन भेट झाली होती.
-
त्या सांगतात की, त्यांची मैत्री टम्बलरवर एकमेकींच्या ब्लॉगला फॉलो करण्यापासून सुरू झाली आणि नंतर त्या इंस्टाग्रामवर कनेक्ट झाल्या.
-
अंजली सांगते की तिने एके दिवशी सूफीला विचारले की आपण दक्षिण आशियाई महिला म्हणून तिच्या अनुभवाबद्दल बोलू शकतो का आणि तिने होकार दिला.
-
जुलै २०१८ पासून त्या दोघी सोबत आहेत.
-
ही जोडी २०१९ मध्ये व्हायरल झाली जेव्हा त्यांनी एका ब्रँड फोटो शूटमध्ये भाग घेतला.
-
हे शूट ‘बॉरो द बाजार’ नावाच्या ब्रँडसाठी होते, जे खास प्रसंगी लोकांना दक्षिण आशियाई कपडे भाड्याने देतात.
-
अंजली आणि सुफी एका वीकेंडला लग्नाला गेल्या होत्या.
-
तिथे लग्नात घालण्यासाठी मोफत कपड्यांच्या बदल्यात त्यांनी ब्रँडसोबत फोटोशूट केले.
-
तिथे फोटोग्राफर सरोवर अहमद यांनी ‘अ न्यू यॉर्क लव्ह स्टोरी’ या कॅप्शनसह शूटमधील फोटो ट्विट केली आणि त्याला ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले.
-
त्यानंतर या दोघींनी एका आठवड्यानंतर स्वतःचे आणखी फोटो पोस्ट केले, जे व्हायरलही झाले.
-
ट्विटरवरून हे फोटो इतके व्हायरल झाली की काही दिवसांतच ते भारत, पाकिस्तान आणि यूकेमधील न्यूज वेबसाइट्स, पेपर्स आणि टीव्हीवर झळकले.
-
लोकांना हे लेस्बियन कपल खूप आवडू लागले आणि त्या दोघी दक्षिण आशियाई कपल म्हणून प्रसिद्ध झाल्या.
-
ही जोडी दोन वेगवेगळ्या धर्मांची आहे.
-
सूफी ही पाकिस्तानी मुस्लीम असून अंजली भारतीय हिंदू आहे.
-
त्या सांगतात की मीडियाने आमची लव्ह स्टोरी कव्हर करताना आमच्या नातेसंबंधाच्या त्या पैलूंकडे खूप लक्ष दिले, जे खूपच मनोरंजक होते.
-
हे जोडपे एकमेकांना त्यांच्या संस्कृतीबद्दल शिकवतात.
-
या दोघींना वाटतं की त्यांच्यामध्ये खूप गोष्टी सारख्या आहेत.
-
त्याचं कारण म्हणजे दोघींचे देश एकेकाळी एक होते.
-
परंतु शोधायला गेलो तर अनेक फरक देखील सापडतात, असं त्या सांगतात.
-
त्या दोघी एकत्र स्वयंपाक करतात आणि प्रत्येक देशातील विविध प्रकारच्या रेसिपींबद्दल बोलतात.
-
“आम्ही एकमेकांसोबत संगीत शेअर करतो आणि सुफी हळूहळू मला उर्दू शिकवत आहेत,” असं अंजली म्हणाली.
-
आपल्या संस्कृतींमध्ये बरेच साम्य आहे आणि आम्ही दररोज त्या संस्कृतीची देवाणघेवाण करतो, असं त्या सांगतात.
-
या दोघी सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय आहेत.
-
दोघी एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
-
बऱ्याचदा त्यांच्या फोटोमध्ये त्यांचे कुटुंबीय देखील असतात.
-
दोघीही एकमेकींचे सण-उत्सव सोबत साजरे करतात.
-
दोघींचे सोशल मीडियावर १ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
-
ही हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तानी लेस्बियन जोडी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे.
-
सूफी आणि अंजली या दोघी एकमेकीसोबत खूप खूश दिसतात.
-
(सर्व फोटो सौजन्य – अजली चक्र आणि सूफी मलिक इन्स्टाग्रामवरून साभार)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली