-
७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक सुरु झाला व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी अनेक कपल्स वेगवेगळ्या योजना आखत आहेत.
-
आपल्या जोडीदाराला सरप्राईज देण्यासाठी शक्कल लढवत आहेत. प्रेमींसाठी हा पूर्ण आठवडा एखाद्या सणापेक्षा कमी नाही.
-
ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीच्या प्रेमी जोडप्यांसाठी हा आठवडा अद्भूत आणि अविस्मरणीय असेल. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
-
मिथुन रास : हा व्हॅलेंटाइन या राशीच्या लोकांसाठी अत्यंत खास असणार आहे.
-
या व्यक्ती आपले प्रेम व्यक्त करतील तसेच याबद्दल त्यांना आपल्या जोडीदाराकडून चांगला प्रतिसाद देखील मिळेल.
-
लग्न करू इच्छिणारे जोडपे आपल्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देऊ शकतात.
-
त्याचबरोबर विवाहित जोडप्यांसाठीही हा व्हॅलेंटाइन वीक प्रेम वाढवणारा ठरणार आहे.
-
कर्क रास : कर्क राशीच्या प्रेमी जोडप्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. साखरपुडा किंवा लग्न ठरू शकते.
-
विवाहित जोडपे एकमेकांना सहकार्य करतील. यामुळे त्यांचे नाते घट्ट होईल. प्रणय वाढेल.
-
सिंह रास : सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातही प्रेमाचा वर्षाव होईल. विवाहित आणि अविवाहित जोडप्यांचे नाते अधिक घट्ट होईल.
-
ज्या जोडप्यांचे कुटुंबीय लग्नाला सहमत नव्हते ते आता सहमत होऊ शकतात.
-
एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे.
-
कन्या रास : कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप आनंदाचा असेल. जे एकटे आहेत त्यांना जोडीदार मिळू शकेल.
-
जोडप्यांमध्ये प्रेम-प्रणय वाढेल. तुम्ही कुठेतरी अविस्मरणीय सहलीला जाऊ शकता.
-
येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. (Photo : Pixabay)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा