-
शतकमहोत्सवी शिवजयंतीचे औचित्य साधून बदलापुरात पहिल्यांदाच जंगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन रविवारी करण्यात आले.
-
सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिकसह ठाणे, पालघर, रायगड अशा जिल्ह्यांमधून या शर्यतींमध्ये सहभाग नोंदवला.
-
अधिकृतपणे पहिल्यांदाच शहरात होत असलेल्या या बैलगाडा शर्यती पाहाण्यासाठी आसपासची शहरे आणि गावातून मोठ्या संख्येने प्रेक्षकही उपस्थित होते.
-
त्यामुळे बदलापूर गावला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
-
बैलगाडी शर्यतींना न्यायालयाने अटी आणि शर्तीवर परवानगी दिली आहे.
-
बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्या ४०० वर्षांची परंपरा राहिली आहे. (सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”