-
हरयाणवी डान्सर सपना चौधरीला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
-
अत्यंत सामान्य कुटुंबातील सपना चौधरी आज देशाचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.
-
सपना चौधरी ही हरियाणवी नृत्यांगना आहे.
-
तिचा स्टेज शो पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमत असते.
-
पण तुम्ही जर कधी तिचा डान्स पाहिला असेल तर एक गोष्ट लक्षात येईल की सपना कायम सलवार सूट घालूनच डान्स करते.
-
तर, यामागचं कारण काय आहे, याचा खुलासा सपनाने केलाय..जाणून घेऊयात..
-
सपना चौधरी सलवार सूटमध्येच स्टेज शो करते. चाहत्यांनाही तिला सलवार सूटमध्ये बघायला आवडतं.
-
सपना चौधरी व्यतिरिक्त अनेक हरियाणवी डान्सर्स आहेत ज्या तिच्यासारख्या सलवार सूटमध्ये स्टेज शो करतात.
-
एका मुलाखतीत सपना चौधरीने सलवार सूटमध्ये डान्स करण्याचे कारण सांगितले होते.
-
सपना चौधरीने सांगितले होते की, याआधी सर्व हरियाणवी कलाकार लेहेंग्यात कार्यक्रम करायचे. तिनेही डान्ससाठी लेहेंगा शिवून घेतला होता.
-
परंतु लेहेंगा घालून डान्स करताना शरीर खूप दिसत होते. यामुळे मला त्रास व्हायचा, असं सपना सांगते.
-
नंतर सपना चौधरीने ठरवले की ती सलवार सूटमध्ये डान्स करणार. कुणाला आवडो वा न आवडो.
-
त्यानंतर सपना चौधरीने सलवार सूटमध्येच स्टेज शो करायला सुरुवात केली.
-
तिची ही स्टाईल लोकांना खूप आवडली आणि हळूहळू तो सलवार सूट ट्रेंड बनला.
-
(सर्व फोटो – सपना चौधरीच्या फेसबुकवरून साभार)

“आमचं लग्न खूप आधीच मोडलं असतं…”, काजोलचं वक्तव्य; अजय देवगणबद्दल म्हणाली, “आम्ही खूप…”