-
भारत असो किंवा जगातील इतर कोणताही देश असो, विशेष क्रमांकाच्या नंबर प्लेट्स आणि त्यासाठी मोजली जाणारी किंमत किंवा लागणारी बोली हे कायमच आकर्षणाचा विषय ठरतात.
-
मात्र तुम्हाला असं सांगितलं की याच आकर्षणापोटी एका नंबर प्लेटसाठी तब्बल ७२ कोटी रुपये खर्च केलेत तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही
-
पण दुबईमध्ये एका नंबर प्लेटसाठी ३५ मिलियन द्राम्स म्हणजेच ७२ कोटी रुपये खरोखरच खर्च करण्यात आलेत.
-
हा एक नवा विक्रम असून जगामध्ये सर्वात महागड्या नंबर प्लेट्सच्या यादीत ही नंबर प्लेट तिसऱ्या स्थानी आलीय.
-
७२ कोटींना विकण्यात आलेल्या या नंबर प्लेटवरील क्रमांक आहे एए८ (AA8) या क्रमाकांचा नुकताच दुबईमध्ये लिलाव करण्यात आला.
-
दुबईमध्ये पार पडलेल्या ‘मोस्ट नोबल नंबर्स’ या चॅरेटी लिलावाच्या कार्यक्रमामध्ये गाड्यांचे विशेष क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिलावात काढण्यात आलेले.
-
झायद ह्युमेनेटेरियन डे म्हणजेच मानवी मुल्यांचं जपवणूक करण्यासाठी दुबईत ओळखल्या जाणाऱ्या २० एप्रिल रोजी हा लिलाव पार पडला.
-
या लिलावमध्ये एका व्यक्तीने तब्बल ३५ मिलियन डॉलर्सला हा क्रमांका विकत घेतला. १२ क्रमांकाच्या टेबलवर बसलेल्या व्यक्तीने ही रक्कम एका नंबर प्लेटसाठी मोजली.
-
मागील वर्षी एए९ या क्रमांकाला ३८ मिलियन द्राम्सची बोली लावण्यात आलेली. ही किंमत आजच्या मूल्यानुसार ७९ कोटी इतकी होते.
-
यंदा एए८ या क्रमांसाठी लावण्यात आलेली बोली ही ज्या गाडीला हा क्रमांक देण्यात आलाय त्या गाडीच्या किंमतीपेक्षाही अधिक आहे.
-
जगभरातील ५० देशांमधील लोकांना अन्नपदार्थ पुरवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘वन बिलियन मिल्स’ म्हणजेच एक बिलियन लोकांपर्यंत जेवण पोहचवण्याच्या मोहिमेसाठी हा पैसा देण्यात येणार आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून दानधर्म केलं जाणार असल्याने अनेकांनी मोठ्याप्रमाणात यासाठी बोली लावली होती.
-
या कार्यक्रमामध्ये एकूण ५३ मिलियन द्राम्सचा निधी गोळा झाला असून एमिरट्स ऑक्शनच्या माध्यमातून एमिरट्स ऑक्शन आणि दुबई रस्ते व वाहतूक प्राधिकरणाने हा लिलाव केलाय.
-
या ७२ कोटींच्या क्रमांकाशिवाय या लिलावामध्ये एफ ५५ हा क्रमांक ४ मिलियन द्राम्स म्हणजेच ८ कोटी ५० लाखांहून अधिकला विकला गेला. त्याचप्रमाणे व्ही ६६ क्रमांकालाही इतकीच बोली लागली.
-
ए८८ ला सर्वाधिक बोली लागली असली तरी या लिलावामध्ये व्हाय ६६ हा क्रमांक ३.८ मिलियन द्राम्सला म्हणजेच जवळजवळ ८ कोटींना विकला गेला.
-
मात्र ७२ कोटींचा एए८ हा क्रमांक जगातील सर्वात महागडला क्रमांक नाहीय. जगातील सर्वात महागडा क्रमांक हा एमएम सीरीजचा आहे. हा क्रमांक अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये आहे. याची किंमत २४ मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयानुसार १८४ कोटी रुपये इतकी आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’