-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
-
शिंदे यांनी कीर्तीकर यांच्या भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.
-
एकनाथ शिंदे आणि गजानन कीर्तीकर यांच्यात नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा झाल्या याबाबत सगळ्यांना उत्सुक्ता लागली आहे.
-
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आमदार संजय शिरसाट, बालाजी किणीकरही उपस्थित होते.
-
गेल्या आठवड्यात कीर्तीकर यांच्या पायाच्या पोटरीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली होती.
-
हेजा रुग्णालयात त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्यांना तीन आठवडे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
-
शस्त्रक्रियेनंतर घरी परतलेल्या कीर्तीकरांची भेट घेत शिंदेनी त्यांच्या तब्यतेची विचारपूस केली.
-
तसेच लवकरात लवकर राजकारणामध्ये सक्रिय होण्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…