-
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना १० तासांच्या चौकशीनंतर रविवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली.
-
पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला हजर न राहिल्यामुळे राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी रविवारी सकाळी सातच्या सुमारास ईडीचे अधिकारी दाखल झाले.
-
यावेळी करण्यात आलेल्या छापेमारीत राऊतांच्या घरातून साडे अकरा लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
-
पत्राचाळ घोटाळ्यातील पैसा राऊतांनी अलिबागमधील प्लॉट विकत घेण्यासाठी वापरल्याचा संशयही ईडीला होता.
-
त्यामुळे याप्रकरणी एप्रिल महिन्यात राऊतांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्तेवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली होती.
-
याच निमित्ताने संजय राऊतांच्या एकूण मालमत्ता आणि संपत्तीवर एक नजर टाकूया.
-
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार असलेले संजय राऊत राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते.
-
मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
निवडणूक आयोगाला पुरवलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर एकूण १४ कोटींपेक्षा अधिक मालमत्ता आहे.
-
२०१४-१५ वर्षात राऊतांचं वार्षिक उत्पन्न ६८ लाख ७८ हजार इतके होते.
-
तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न १३ लाखांहून अधिक होते.
-
अलिबाग येथे राऊत दाम्पत्याच्या नावे सुमारे २ कोटी ४५ हजारांची शेतजमीन आहे.
-
याशिवाय राऊतांच्या पत्नीच्या नावावर अलिबागमध्ये ५० लाख किंमतीची मालमत्ता आहे.
-
मुंबईतील भांडुप, सायन आणि लिंक रोड येथे त्यांची व्यावसायिक मालमत्ता आहे. याची किंमत तीन कोटींच्या घरात आहे.
-
याशिवाय भांडुप आणि दादरमध्ये त्यांच्या नावावर पाच कोटींहून अधिक रकमेचे फ्लॅट आहेत.
-
ईडीकडून छापा टाकण्यात आलेल्या राऊतांच्या मालकीच्या भांडुप येथील निवासस्थानाची किंमत एक कोटींच्या घरात आहे.
-
राऊत दाम्पत्याने एलआयसी आणि इतर पॉलिसीमध्ये १४ लाख २५ हजारांची गुंतवणूक केली आहे.
-
त्यांच्याकडे २५ लाखांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत.
-
राऊतांनी ८० लाखांचे तर त्यांच्या पत्नीने तीन कोटींचे कर्ज घेतले आहे.
-
मुंबईतील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी राऊतांना झालेल्या अटकेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.
-
‘ईडी’च्या कारवाईला घाबरणार नाही, त्यांच्या दबावापुढे झुकणार नाही आणि घाबरून शिवसेनाही सोडणार नाही, असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला आहे.
-
‘ईडी’ने माझ्याविरोधात खोटे पुरावे तयार करून कारस्थान रचून कारवाई केली आहे. ही कारवाई खोटी आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, संजय राऊत/ इन्स्टाग्राम)

Operation Sindoor Live Updates: भारतीय लष्करानं पत्रकार परिषदेत स्पष्ट केली एअर स्ट्राईकसंदर्भात सविस्तर भूमिका!