-
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि त्यावेळी महागाईचा दर सुमारे २% होता, परंतु २०२२ मध्ये महागाईचा दर ६.६% पर्यंत वाढला आहे.
-
१९४७ मध्ये एक लिटर दुधाची किंमत १२ पैसे होती. आज दुधाचा दर ५९ रुपये प्रतिलिटर आहे.
-
आज १० ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास ५० हजार रुपयांवर पोहोचली आहे, तर १९४७ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ८८.६२ रुपये होती.
-
१९४७ मध्ये २७ पैसे प्रति लिटर दर असलेले पेट्रोल आता १००रुपयांच्या जवळ पोहचले आहे.
-
जी सायकल आज ४५००-५००० रुपयांना विकत मिळते ती ७४ वर्षांपूर्वी फक्त २० रुपयांमध्ये उपलब्ध होते.
-
१९४७ साली एका डॉलरची किंमत ३ रुपये होती. आज एका डॉलरची किंमत ७० रुपये आहे.
-
आज दिल्ली ते मुंबई विमानाचे तिकीट ५००० रुपयांपेक्षा जास्त आहे. तर १९४७ मध्ये ते फक्त १४० रुपये होते.
-
दिल्ली ते मुंबई फर्स्ट क्लास चे भाडे ७४ वर्षांपूर्वी फक्त १२३ रुपये होते. तर आज हे भाडे ५०२५ रुपये आहे.
-
१९४७ साली ४० पैसै प्रति किलो मिळाणारी साखर आता ५० रुपये प्रतिकिलोच्या जवळ पोहचली आहे.
-
भारतात बटाट्याचा वापर खूप जास्त आहे. १९४७ मध्ये एक किलो बटाट्याची किंमत फक्त २५ पैसे होती. म्हणजेच, तुम्ही १ रुपयात ४ किलो बटाटे खरेदी करू शकता. तर आज बटाट्याचा दर २५ रुपये किलो आहे.
-
१९४७ मध्ये एक किलो तांदळाची किंमत फक्त १२ पैसे होती. होय, फक्त १२ पैसे. तर आज तांदळाचा दर ७० रुपये प्रति किलो आहे. स्वातंत्र्यापूर्वी ८ किलो तांदूळ फक्त एका रुपयाला विकत घेता येत असे.
-
१९४७ साली गव्हाच्या पीठाची किंमत १० पैसे प्रतिकिलो होती. आता ही किंमत २० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहचली आहे.
सूरजच्या नव्या घराची पहिली झलक! अंकिताने पाहिलं भावाचं ‘ड्रीम होम’, नवीन बंगल्यात करणार बायकोचं स्वागत, पाहा…