-
ऋषभ पंत वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या ऋषभ पंतची एकूण संपत्ती ६६.४२ कोटी रुपये इतकी आहे.
-
२०२१ मध्ये, पंतची एकूण संपत्ती ५ मिलियन डॉलर होती. भारतीय रुपयानुसार ही रक्कम ३९ कोटी रुपये इतकी आहे.
-
ऋषभ पंतला महागड्या कारची फारच आवड आहे.
-
सध्या ऋषभ पंतकडे Merecedez, Audi A8 आणि Ford या आलिशान कार आहेत. या कारची किंमत अनुक्रमे २ कोटी, १.८ कोटी आणि ९५ लाख रुपये इतकी आहे.
-
उत्तराखंड हरिद्वार येथे ऋषभ पंतचं एका आलिशान घर आहे.
-
पंतचे वार्षिक उत्पन्न सुमारे १० कोटी रुपये आहे, तर तो महिन्याला ३० लाख रुपये कमावतो.
-
ऋषभ पंत हा बीसीसीआयच्या कराराच्या ‘ग्रेड ए’मध्ये येतो, ज्या अंतर्गत त्याला वार्षिक ५ कोटी रुपये मिळतात. याशिवाय आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी ऋषभला प्रत्येक मोसमासाठी ८ कोटी रुपये मिळतात.
-
ऋषभ पंतने भारतासाठी आतापर्यंत ३१ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ५५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४३.३३ च्या सरासरीने २१२३ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात ३६.५२ च्या सरासरीने ८४० धावा आणि T20 मध्ये २३.८६ च्या सरासरीने ८८३ धावा केल्या आहेत.
चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
