-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
-
राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ४० मिनिटांच्या भेटीत काय गप्पा झाल्या याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
-
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे होते. तसेच मनसे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई हेही यावेळी उपस्थित असल्याचे समजत आहे
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा आज या भेटीदरम्यान उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं.
-
दसऱ्या मेळाव्यावरून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात वाद सुरु असताना व मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; नाशिकमध्ये अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?