-
तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल, तर पोस्ट ऑफिसची ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
-
आजच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडे पर्यायांची कमतरता नाही.
-
जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एलआयसी, पोस्ट ऑफिस स्कीम आणि बँक एफडी असे उत्तम पर्याय आहेत.
-
जर तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला अशा योजनांची माहिती असणं आवश्यक आहे, अशा योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.६ टक्के परतावा मिळू शकतो.
-
‘सुकन्या समृद्धी योजना’ ही पोस्ट ऑफिसची एक उत्तम योजना आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेत ० ते १० वर्षे वयोगटातील मुलीसाठी गुंतवणूक करता येते. यासाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता.
-
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही दरवर्षी २५० ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर ती खात्यात जमा केलेले सर्व पैसे काढू शकते. तुम्ही दोन मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता.
-
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ ही एक उत्तम योजना आहे.
-
यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला ७.४ टक्के परतावा मिळू शकतो. यामध्ये एकावेळी १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
-
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक पोस्ट ऑफिसची भरघोस व्याज देणारी योजना मानली जाते. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला वर्षाला ६.८ टक्के परतावा मिळू शकतो.
-
यामध्ये तुम्ही १०० रुपये ते कमाल कितीही रक्कम गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला गुंतवणुकीवर आयकर कलम ८० (क) नुसार सूट मिळते.
-
किसान विकास पत्र हीदेखील पोस्ट ऑफिसची एक अशीच योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळण्याची हमी मिळते.
-
यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वर्षाला ६.९ टक्के परतावा मिळतो. यामध्ये एकूण १४ महिन्यांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात.

Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या द्या मराळमोळ्या शुभेच्छा! प्रियजनांना WhatsApp Status, Facebook Messagesवर पाठवा खास शुभेच्छा संदेश