-
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७२ वा वाढदिवस आहे.
-
वाढदिवसानिमित्त मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
भारतातसह परदेशातील अनेक नेत्यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
-
भारतीय वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यांवर चहाच्या मातीच्या कपांचा वापर करुन मोदींना विशेष पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
-
पंतप्रधान मोदींनी आपल्या वाढदिवसानिमित्त भारतीय नागरिकांना एक खास गिफ्ट दिलं आहे.
-
भारतातून नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतात परतले आहेत.
-
तब्बल ७० वर्षानंतर अफ्रिकेच्या नामिबियातून ८ चित्त्यांना भारतात आणण्यात आलं आहे.
-
या ८ चित्त्यांमध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत.
-
वायू दलाच्या विशेष विमान कार्गो फ्लाइट बोइंग-७१७ने त्यांना भारतात आणण्यात आलं.
-
या चित्त्यांना घेऊन हे विमान ग्वाल्हेर विमानतळावर उतरले.
-
यावेळी विमानतळावर नरेंद्र मोदींसह नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया उपस्थित होते.
-
त्यानंतर हवाई दलाच्या हॅलिकॉप्टरने या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले.
-
चित्त्यांना एका महिन्यासाठी लहान प्रदेशात ठेवले जाईल आणि यानंतर दोन महिन्यांसाठी परिसराची ओळख होण्यासाठी मोठ्या भागात सोडले जाईल.
-
यानंतर त्या चित्त्यांना जंगलात सोडण्यात येईल.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले चित्ते सोडले
-
यावेळी मोदींना चित्त्यांचा फोट काढण्याचा मोह आवरता आला नाही.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक