-
New credit card, demat, NPS, APY rules: 5 money changes that will come into effect from October : ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे. आज १ ऑक्टोबर २०२२ पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. (Representational image, source: Pixabay)
-
तसंच बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. यासाठी आरबीआयने आदेशही जारी केला आहे.
-
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यूजर्ससाठी, RBI १ ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन (CoF कार्ड टोकनायझेशन) नियम आणत आहे.
-
तसेच मुंबईत आज पहिली सोलर पॅनलची एसी लोकल धावण्यास सुरूवात झाली आहे.
-
तर 5G सेवेचा शुभारंभ झाला आहे. (Photo Credits: Reuters)
-
गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होणार आहे. आजपासून गॅस सिलिंडर,व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २५.५० रुपयांनी, मुंबईत ३२.५० रुपयांनी, कोलकात्यात ३६.५० रुपयांनी आणि चेन्नईमध्ये ३५.५० रुपयांनी कमी केल्या आहेत. (Express photo by Praveen Khanna)
-
आजपासून दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर १८५९.५० रुपयांना, मुंबईत १८११.५० रुपयांना, कोलकात्यात १९५९.०० रुपयांना आणि चेन्नईमध्ये २००९.५० रुपयांना उपलब्ध आहे.
-
आजपासून नॅशनल पेन्शन स्कीमचे ई-नामांकन खूप सोपे झाले आहे. आता ई-नामांकन केल्यानंतर, तुमचा अर्ज नोडल ऑफिसरकडे ऑनलाइन पाठवला जाईल. या विनंतीवर काही दिवसांत कोणतीही कार्यवाही न झाल्यास अशा परिस्थितीत हा अर्ज स्वीकारला जाईल.
-
RBI कार्ड टोकनायझेशन नियम आजपासून लागू झाला आहे. आता कार्डद्वारे पेमेंट केल्यावर त्याचे तपशील प्रविष्ट करण्याऐवजी तुम्हाला टोकन प्रविष्ट करावे लागेल. हे तुमचे कार्ड पेमेंट अधिक सुरक्षित करेल.
-
आजपासून तुमच्या डिमॅट खात्यात लॉग इन करण्यासाठी तुम्हाला टू-स्टेप ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. प्रथम तुम्हाला बायोमेट्रिक डेटा सबमिट करावा लागेल. यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड इत्यादी माहिती टाकावी लागेल. त्यानंतर तुम्ही सहज खात्यात लॉग इन करू शकता. या पडताळणीमुळे तुमचे खाते सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहील.
-
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजपासून नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आता आयकर जमा करणारे लोक अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून वृद्धापकाळात ५००० रुपयांपर्यंतचे पेन्शन घेऊ शकणार नाहीत.
-
मुंबईत आज पहिली सोलर पॅनलची एसी लोकल धावणार आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर खास डिझाइन केलेली उच्च क्षमतेची एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे. सौर पॅनेलसह विजेचे दिवे असलेली ही पहिली लोकल ट्रेन असल्याचं पश्चिम रेल्वेच्या अधिका-यांनी सांगितलं. सेमी हाय स्पीडची ही खास डिझाइन केलेली हाय पॉवर ट्रेन आहे.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल