-
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
-
आठ वर्षांच्या असल्यापासून त्यांचे वडील त्यांचं लैंगिक शोषण करत होते, असं त्यांनी सांगितलं आहे.
-
अलीकडेच त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
-
अनेक वर्षांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करणाऱ्या खुशबू सुंदर कोण आहेत, ते जाणून घेऊयात.
-
‘द बर्निंग ट्रेन’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या खुशबू यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
खुशबू सुंदर या दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठ्या स्टार होत्या. त्यांनी २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
१९८५ साली ‘मेरी जंग’ चित्रपटात खुशबू यांनी ‘बोल बेबी बोल, रॉकेन रोल’ या गाण्यावर जावेद जाफरीबरोबर डान्स केला होता.
-
बॉलिवूडमध्ये १९८५ साली ‘जानू’ या चित्रपटात त्यांनी जॅकी श्रॉफबरोबर मुख्य भूमिका साकारली होती.
-
१९९० साली ‘दीवाना मुझसा नही’ या चित्रपटात आमिर खान आणि माधुरी दिक्षित यांच्याबरोबर महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
खुशबू यांनी २०१० मध्ये द्रमुक पक्षात प्रवेश करून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
-
२०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होत्या. त्या सहा वर्षे काँग्रेसमध्ये होत्या.
-
२०२० मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता.
-
सोनिया गांधींना राजीनामा सोपवून दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला होता.
-
सध्या त्या त्यांनी वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लहानपणी झालेल्या अत्याचाराबद्दल खुलासा केल्याने चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो – खुशबू सुंदर यांच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”