-
भारतासह संपूर्ण जगभरात सोन्यातील भेसळ वाढत आहे. सोन्यामध्ये अनेक प्रकारची अशुद्धता देखील पाहायला मिळते, परंतु तेसुद्धा खऱ्या सोन्यासारखेच चमकते, त्यामुळे सोने शुद्ध आहे की बनावट हे समजू शकत नाही. जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्याची शुद्धता तपासणे आवश्यक आहे, यासाठी तुम्ही ते घरबसल्याही तपासू शकता. आज या बातमीच्या माध्यमातून खरे सोने कसे ओळखावे. तुम्ही घरच्या घरीच खरे खोटे सोने ओळखण्याची पद्धत आणि ते तपासण्याच्या पद्धती जाणून घ्याल. (सर्व छायाचित्र – file photos)
-
सोन्याच्या सतत वाढत जाणाऱ्या किमतींमुळे गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळतो. आजही गुंतवणूकदार सोने खरेदी करतात आणि किंमत वाढल्यावर विकतात, अशा स्थितीत बनावट सोन्याची विक्रीही वाढत आहे. ग्राहकांचे यामुळे नुकसान होत आहे. सोने खरे आहे की बनावट हे समजून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्याद्वारे आपण त्याची शुद्धता तपासू शकतो. तसेच भारत सरकारने मानके ठरवून दिली आहेत, ज्याद्वारे सोन्याची शुद्धता शोधता येते.
-
सोने हे चुंबकीय धातू नाही. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही सोन्याजवळ चुंबक घेता तेव्हा ते चुंबकाला चिकटणार नाही. तुमच्याकडे असलेले सोने बनावट असल्यास तुम्ही चुंबकाच्या मदतीने खरे खोटे ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांजवळ चुंबक न्यावे लागेल, जर दागिने चुंबकाकडे थोडेसे आकर्षित झाले तर तुमच्या दागिन्यांमध्ये भेसळ आहे हे समजावे.
-
पहिल्यांदा तुमच्याकडे असलेल्या सोन्यामध्ये तुम्हाला थोडासा ओरखडा करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला त्या स्क्रॅच केलेल्या जागेवर नायट्रिक ऍसिडचे दोन थेंब टाकावे लागतील. जर स्क्रॅच केलेला भाग लगेच हिरवा झाला तर याचा अर्थ सोन्यात भेसळ आहे. दुसरीकडे स्क्रॅच केलेल्या भागात ऍसिडच्या थेंबाचा कोणताही प्रभाव न जाणवल्यास सोने खरे आहे, तुम्ही ते सोने खरेदी करू शकता.
-
ही एक अतिशय सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला एक खोल भांडे घेऊन त्यात २ ते ३ ग्लास पाणी टाकावे लागेल आणि त्या पाण्यात तुमचे सोन्याचे दागिने टाकावे लागतील, जर काही वेळाने तुमचे दागिने पाण्यात तरंगताना दिसले तर याचा अर्थ सोने खरे नाही, कारण सोने तरंगत नसून उलट ते पाण्याच्या पृष्ठभागावर राहते.
-
सिरॅमिक प्लेटच्या साहाय्यानेही तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता, यासाठी तुम्हाला बाजारातून सिरॅमिकची प्लेट आणावी लागेल आणि त्यावर तुमचे सोन्याचे दागिने घासावे लागतील, जर त्या प्लेटवर थोडासा काळा डाग पडलेला दिसल्यास सोने भेसळयुक्त आहे. म्हणजे ते खोटे आहे आणि जर प्लेटवर फिकट सोनेरी रंगाचे चिन्ह दिसले तर सोने खरे आहे.
-
सोन्याची शुद्धता तपासण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे, यासाठी तुम्हाला तुमचे दागिने काही काळ दातांवर दाबावे लागतील. जर तुमच्या दागिन्यांवर थोडासा खूण असेल, तर याचा अर्थ ते खरे सोने आहे, कारण सोने हा एक मऊ धातू आहे, जो सहज चिन्हांकित करतो. सोने हा मऊ धातू असल्याने त्याला ताकद देण्यासाठी काही प्रमाणात इतर धातू मिसळले जातात.
-
केंद्र सरकारच्या सर्टिफिकेशन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने सोन्याची शुद्धता राखण्यासाठी काही मानके तयार केली आहेत, ज्यावरून सोन्याची शुद्धता ओळखली जाते. तुम्ही जेव्हाही दागिने खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा सोन्यात हॉलमार्क आढळलाच पाहिजे.
-
२२ कॅरेट सोन्याचा रंग चमकदार पिवळा असल्याने तुम्ही त्याच्या रंगाच्या मदतीने सोन्याची शुद्धता देखील तपासू शकता.
-
१८ कॅरेट सोन्याचा रंग हलका पिवळा असतो. सोन्याच्या रंगावरूनही तुम्ही सोन्याची शुद्धता ओळखू शकता.
-
(वरील लेख हा प्राप्त माहिती आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी ज्वेलर्सशी संपर्क साधा, विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच दागिने खरेदी करा, जेणेकरून तुमच्या शंका दूर होतील.)
