-
तुम्ही रम, व्हिस्की, वोडका, बिअर, वाईन या अल्कोहोलच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल कधी ना कधी ऐकलेच असेल. पण मद्याच्या या प्रकारांत नेमका काय फरक असतो माहित आहे का? जाणून घेऊ.. (फोटो – freepik)
-
मद्य वेगवेगळ्या प्रकारात मिळते आणि या सर्व प्रकारात अल्कोहोलचे प्रमाणही वेगळे असते. याशिवाय प्रत्येक प्रकार बनवण्याच्या पद्धतीतही फरक असतो. अल्कोहोलचे प्रमाण आणि तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे अल्कोहोलच्या प्रकाराचा प्रभावदेखील बदलतो. (फोटो – freepik)
-
रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण खूप जास्त असते. यात ४० टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असते. पण, मद्याच्या या प्रकाराची किंमत तुलनेने फार कमी असते. बहुतेक लोकांना हिवाळ्यात रम प्यायला आवडते. फोटो – freepik)
-
रम बनवण्यासाठी सर्वप्रथम उसाचा रस आंबवला जातो. यानंतर त्याचे डिस्टिलेशन केले जाते. जळलेल्या ओक किंवा लाकडी बॅरलमध्ये रम काही काळ साठवली जाते, ज्यामुळे तिचा रंग गडद होतो आणि चव अधिक तीव्र होते. फोटो – freepik)
-
पाण्याप्रमाणे पारदर्शक दिसणार्या वोडकामध्ये ६० टक्के अल्कोहोल असते, त्यामुळे त्याची नशा अधिक चढते आणि दीर्घकाळ टिकते. मद्याचा हा प्रकार धान्य आणि ऊसाच्या मळीपासून बनवला जातो.फोटो – freepik)
-
वाईन लाल आणि पांढर्या रंगात येते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण फार कमी असते. त्याची चवही अगदी सौम्य असते. वाईनमध्ये ९ ते १८ टक्के अल्कोहोल असते. (फोटो – freepik)
-
गहू आणि बार्लीसारख्या धान्यांपासून व्हिस्की बनविली जाते. त्यात ३० ते ६५ टक्के अल्कोहोल असते. व्हिस्कीमध्ये साधारणपणे ४० टक्के अल्कोहोल असते. (फोटो – freepik)
-
जव, तांदूळ आणि मक्यापासून बिअर बनविली जाते. तिन्हींचे मिश्रण गरम पाण्यात भिजवून मग त्याचे चांगले मॅशिंग करून त्यातून द्रव पदार्थ काढला जातो. यानंत तो द्रव पदार्थ हॉप्समध्ये मिसळून उकडून घेतला जातो, मग तो थंड केला जातो. यानंतर त्यात ऊसाची मळी टाकून आंबवलं जातं आणि नंतर गाळले जाते आणि बिअर बनवली जाते. (फोटो – freepik)
-
मद्याच्या प्रकारानुसार चव आणि रंग यात फरक असतो. लोक त्यांच्या आवडीनुसार कॉकटेलसाठी एक किंवा दोन-तीन प्रकारचे मद्य निवडतात. (फोटो – freepik)
पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी