-
आंध्र प्रदेशातील साई तिरुमलानेदी यांनी आतापर्यंतचे सर्वात लहान वॉशिंग मशीन तयार करून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या इंस्टाग्राम पेजवर ही विलक्षण कामगिरी नुकतीच शेअर करण्यात आली आहे.
-
साई तिरुमलानेदी याच्या या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत असून आणि लोकांना ही मशीन कशी असेल हे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
२१ फेब्रुवारी रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केलेला व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिरूमलानेदीने तयार केलेल्या छोट्या वॉशिंग मशीनच्या निर्मितीच्या प्रक्रियेची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
-
सुरुवातीला साई एक छोटीशी मशीन घेतो ज्याला मशीनमध्ये असो तसा ड्रम जोडलेला आहे. मशीन चालू करताच तो गोलगोल फिरताना दिसत आहे. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने, अगदी लहान लहान भाग जोडून तो व्यवस्थित चालणारी वॉशिंग मशीन तयार करतो ज्याला एक बटन आणि लहान पाईप देखील जोडला आहे
-
तिरुमलानीदी जेव्हा मशीनची चाचणी घेतात तेव्हा सर्वात लहान मशीन कशी काम करते हे पाहणे नक्कीच आश्चर्यकारक होते. तो मशीनमध्ये पाणी आणि डिटर्जंटसह एक कापडाचा तुकडा टाकतो आणि मशीन सुरू करतो.
-
मशीनमध्ये कपडा धुण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर मशीनमधून तो स्वच्छ कापड काढतो. अगदी लहान अकार असूनही ही मशीन प्रभावीपणे काम करते आहे.
-
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “साई तिरुमलानेदीचे सर्वात लहान वॉशिंग मशीन आहे ज्याता आकार ३७ एमएम x ४१एमएम x ४३ एमएम (१.४५ इंच x १.६१इंच x१.६९इंच) इतका आहे.
-
ऑनलाइन पोस्ट केल्यापासून, व्हिडिओला आतापर्यंत ७ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर कमेंट् आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
अनेकांनी व्हिडीओ पाहून साईचे कौतूक केले आहे. -
व्हिडीओ पाहून “चांगले काम, भाऊ,” असे एक इंस्टाग्राम वापरकर्ता म्हणाला. तर “भारत प्रतिभावान लोकांनी भरलेला आहे,” असे आणखी एका वापरकर्त्याने सांगितले.
“काहीतरी रेकॉर्ड करण्यासारखे आहे,” दुसऱ्याने कमेंट केली.
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ