-
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या कारकर्दीत मोठे यश मिळवले आहे.
-
उत्कृष्ट वेगवान गोलंदाजीसाठी या खेळाडूला ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ असे नावही देण्यामध्ये आले होते.
-
आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरच्या जीवनात पुन्हा एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
-
शोएब अख्तर आणि पत्नी रुबाब खान यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
-
1 मार्च 2024 ला शोएब अख्तर आणि पत्नी रुबाब खान यांनी आपल्या तिसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे.
-
शोएब अख्तर वयाच्या 48 व्या वर्षी बाबा झाला आहे. त्याने नआपल्या मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त केला आहे.
-
शोएब अख्तरने आपल्या मुलीच्या सुंदर फोटोसह ही गोड बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
-
ही पोस्ट पाहून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या आनंदाच्या प्रसंगी शोएबने कॅप्शनमध्ये लिहले, “मिकेल आणि मुजद्दादला आता एक लहान बहीण आहे. देवाने आम्हाला मुलगी दिली आहे. आम्ही आमच्या कुटुंबात नूर अली अख्तरचे स्वागत करतो. तिचा जन्म 1 मार्च 2024 रोजी झाला आहे. तुमच्या सर्व प्रार्थनांसाठी मी आभारी आहे.”
-
या जोडप्याला मोहम्मद मिकेल अली आणि मोहम्मद मुजद्दाद अली अशी दोन मुलं आहेत. २०१६ मध्ये शोएब अख्तरचा पहिला मुलगा मिकाईलचा जन्म झाला होता.
-
तर मोहम्मद तशतदादचा जन्म 2019 मध्ये झाला आणि आता पुनः एकदा त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
-
शोएब अख्तरने रुबाब खानसोबत 2014 मध्ये लग्न केले होते.
-
(सर्व फोटो- शोएब अख्तर/इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली