-
टाटा पंच ही सलग दुसऱ्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे आणि गेल्या एप्रिलमध्ये या कारने १९ हजारांहून अधिक नवीन ग्राहक मिळवले आहेत. जाणून घेऊया या स्वस्त ५ सीटर SUVचे वैशिष्ठ्यांबद्दल.
(फोटो-कार-देखो ) -
टाटा पंच त्याच्या स्टायलिश डिझाईन, स्ट्रॉंग इंजिन आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंगसह आधुनिक वैशिष्ठ्यांमुळे वाजवी दरात उपलब्ध आहे. (फोटो-कार-देखो )
-
टाटा पंच SUVमध्ये बोल्ड आणि स्टायलिश डिझाइनसह टाटा मोटर्सची इम्पॅक्ट २.० डिझाइन लँग्वेज वापरण्यात आली आहे, ज्यामुळे ती मॉडर्न लुक देते. या SUV मध्ये ‘LED हेडलॅम्प’, ‘LED टेल लाइट’ आणि ‘१६-इंच अलॉय व्हील’सह इतर अनेक स्टायलिश वैशिष्ट्ये देखील आहेत. (फोटो-कार-देखो )
-
टाटा पंच SUV तीन प्रकारामध्ये म्हणजे पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिकमध्ये उपलब्ध आहे. टाटा पंच SUV तुम्हाला पेट्रोलसह पेट्रोल प्लस सीएनजी या पॉवरट्रेनमध्ये खरेदी करण्याचा पर्याय मिळतो. यामध्ये १.२ लिटर पेट्रोल आणि १.२ लिटर टर्बो-पेट्रोल तसेच फॅक्टरी-फिट सीएनजी किटचा ही पर्याय आहे. (फोटो-कार-देखो )
-
पंच तिन्ही पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि चांगले मायलेज देते. तुम्ही ही कार शहर ड्रायव्हिंग आणि हायवे प्रवासासाठी योग्य मानू शकता. पंच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह देखील येते. (फोटो-कार-देखो)
-
टाटा पंच हे आधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, जे तुम्हाला आरामदायी आणि सोयीस्कर ड्रायव्हिंगचा अनुभव देते. यात ७ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सनरूफ, कनेक्टेड कार टेक्नॉलजी, आरामदायी सीट, चांगले फुट स्पेस, यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. (फोटो-कार-देखो )
-
टाटा पंच तुमच्या सुरक्षिततेला लक्षात घेऊन डिझाइन केली गेली आहे. याला ग्लोबल NCAP मध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वात सुरक्षित कार आहे. यात एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि पार्किंग सेन्सर्ससह इतर सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.(फोटो-कार-देखो )
-
टाटा पंचची सर्वात खास गोष्ट जी ग्राहकांच्या पसंतीस उतरते ती म्हणजे त्याची परवडणारी किंमत. ऑक्टोबर २०२१ मध्ये भारतीय बाजारात अवघ्या रु५.४९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली गेली होती. सध्या, टाटा पंचच्या पेट्रोलची सुरुवातीची किंमत रु ६,१३ आहे.
(फोटो-कार-देखो ) -
टाटा पंच सीएनजीची किंमत रु. ७.२३ लाख आणि पंच EV ची सुरुवातीची किंमत रु. १०.९९ लाख आहे. या किंमतीच्या टप्प्यावर पंच वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतेचे उत्कृष्ट पॅकेज ऑफर करते, जे बजेट कार खरेदीदारांसाठी एक आकर्षक पर्याय बनवते. (फोटो-कार-देखो )

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा