-
भारतात अशा अनेक शाळा आहेत ज्या त्यांच्या महागड्या फी आणि सुविधांसाठी ओळखल्या जातात. महागड्या शाळांबद्दल बोलायचे झाले तर त्यात दून स्कूल, सिंघिया आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा समावेश आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात मोठी शाळा भारतात कुठे आहे आणि तिचे नाव काय आहे? (फोटो: सिटी मॉन्टेसरी स्कूल/इन्स्टा)
-
वास्तविक, जगातील सर्वात मोठी शाळा भारतातील उत्तर प्रदेश येथे आहे. ही शाळा यूपीची राजधानी लखनऊमध्ये आहे. अनेक बड्या स्टार्सनीही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
लखनौमधील या शाळेचे नाव सिटी मॉन्टेसरी स्कूल आहे. जगातील सर्वात मोठी शाळा म्हणून या शाळेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेदेखील नोंद घेतली आहे. (फोटो: सिटी मॉन्टेसरी स्कूल/इन्स्टा)
-
सिटी माँटेसरी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ६१,३४५ आहे. ही शाळा ४ भागांमध्ये विभाजीत आहे. पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, कनिष्ठ आणि वरिष्ठ विभाग. (फोटो: सिटी मॉन्टेसरी स्कूल/इन्स्टा)
-
सिटी मॉन्टेसरी स्कूलची स्थापना डॉ. जगदीश गांधी आणि डॉ. भारती गांधी यांनी १९५९ मध्ये ३०० रुपये गुंतवणूक करुन केली होती. त्या काळात त्यांनी फक्त एका खोलीत ५ मुलं घेऊन ही शाळा सुरू केली. यासोबतच ही शाळा CMS कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) शी संलग्न आहे. (फोटो: सिटी मॉन्टेसरी स्कूल/इन्स्टा)
-
दरम्यान आता या शाळेत १००० पेक्षा जास्त वर्गखोल्या आणि सुमारे ३७०० संगणक आहेत. यासोबतच या शाळेतील शिक्षक, सहाय्यक कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची संख्या ४५०० च्या आसपास आहे. (फोटो: सिटी मॉन्टेसरी स्कूल/इन्स्टा)
-
आपल्या ड्रेसमुळे अनेकदा चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेदनेही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे. (फोटो: उर्फी जावेद/इन्स्टा)
-
प्रसिद्ध गायक लकी अली, अभिनेत्री सेलिना जेटली आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैना यांनीही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”