-
बुधवार, ९ जुलै २०२५ रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. १० केंद्रीय कामगार संघटनांनी संयुक्तपणे हा बंद पुकारला आहे. (File Photo)
-
अशा परिस्थितीत, जर तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम काय उघडे आणि काय बंद राहील ते माहित असणे गरजेचे आहे… (File Photo)
-
बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रातील २५ कोटींहून अधिक कर्मचारी यात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. (Photo: Pexels)
-
बंदमागचं कारण काय?
सरकारची धोरणे कंपन्यांसाठी फायदेशीर असून कामगारांच्या विरोधात आहेत, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील ३० कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. युनियन फोरमच्यामते, या संपात २५ ते ३० कोटी कर्मचारी सहभागी होऊ शकतात. (File Photo) -
बँक कर्मचारी संघटनेने म्हटले आहे की ते केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरुद्ध आणि कॉर्पोरेट समर्थक आर्थिक सुधारणांविरुद्ध संपावर जात आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. (File Photo)
-
काय बंद असेल?
या बंददरम्यान बँकिंग आणि वित्तीय सेवा, टपाल विभाग, कोळसा खाण आणि कारखाने, राज्य वाहतूक सेवा आणि सरकारी कार्यालये यासह अनेक क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (File Photo) -
वाहतुकीवर होईल परिणाम
एनएमडीसी आणि स्टील आणि खनिज क्षेत्रातील अनेक सरकारी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होण्याची तयारी दाखवली आहे. प्रवासासाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी ही घडामोड महत्त्वाची आहे. अनेक शहरांमध्ये कामगार संघटना आणि सहयोगी गटांनी काढलेल्या निषेध मोर्चा आणि रस्त्यावरील निदर्शनांमुळे सार्वजनिक बसेस, टॅक्सी आणि अॅप-आधारित कॅब सेवांवर परिणाम होऊ शकतो. (File Photo) हेही पाहा- Photos : मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांचा एल्गार; मोर्चामध्ये मनसेसह ठाकरे गटाचे नेतेही सहभागी

Vadodara Bridge Collapse : वडोदरामध्ये मोठी दर्घटना, महिसागर नदीवरील पूल कोसळला; अनेक वाहनं नदीत पडली, ९ जणांचा मृत्यू