-
भारतात आता टेसलाची अधिकृत एन्ट्री झाली आहे, मुंबईत पहिले शोरूम बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सला Tesla Experience Centre चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. (Photo: Meta AI)
-
तसेच नव्या गाडीची किंमत किती असणार हेही आता समोर आले आहे, टेस्लाने पहिल्या टप्प्यात भारतात त्यांची मॉडेल वाय ही कार लॉन्च (Tesla Model Y Launched In India) केली आहे. या कारची ऑन रोड किंमत ६१ लाख रुपये (Tesla Model Y Car Price) इतकी असणार आहे. दरम्यान, भारतामध्ये व्यवसाय करताना टेस्लाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. भारतात आधीच कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांशी टेस्लाला स्पर्धा करावी लागणारे आहे, चला याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Meta AI)
-
टेस्लासमोर भारतातील प्रमुख स्पर्धक:
टाटा मोटर्स:
टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक ‘नेक्सन’ आणि ‘टियागो’ यांसारख्या गाड्या बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहेत आणि त्यांची चांगली विक्री होत आहे. (Photo: Meta AI) -
महिंद्रा:
महिंद्रा ‘XUV400’ आणि इतर इलेक्ट्रिक मॉडेल्ससह भारतीय बाजारपेठेत मजबूत स्थितीत आहे. (Photo: Meta AI) -
मारुती सुझुकी:
मारुती सुझुकी लवकरच त्यांची इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाजारात स्पर्धा वाढेल. (Photo: Meta AI) -
ह्युंदाई आणि किया:
या कंपन्यांच्या आधीपासूनच इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यांची चांगली विक्री होत आहे, त्यामुळे टेस्लासाठी ते एक मोठे आव्हान असतील. (Photo: Meta AI) -
टेस्लासमोरची आव्हाने:
किंमत:
टेस्लाच्या गाड्या तुलनेने महाग आहेत, त्यामुळे भारतीय ग्राहकांना स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत. (Photo: Meta AI) -
उत्पादन:
टेस्ला सध्या भारतात उत्पादन करत नाही, ज्यामुळे आयात शुल्क आणि इतर खर्च वाढतो. (Photo: Meta AI) -
चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर:
भारतात चार्जिंग स्टेशन्सची संख्या अजूनही कमी आहे, ज्यामुळे टेस्लाच्या गाड्या वापरण्यात अडचणी येऊ शकतात. (Photo: Meta AI) हेही पाहा- समोसा, जिलेबी हे पदार्थ ‘या’ मुस्लिम देशांतून भारतात आले; यांच्याबाबत तंबाखू विरोधासारखे फलक लागणार

उद्धव ठाकरेंचा सवाल; “अंबादास दानवेंसारख्या कार्यकर्त्यासाठी मी भाजपाचे आभार मानतो, पण तुम्ही….”