-
“बस”, “ये”, “नाही”, “चला”… हे शब्द केवळ आपणच समजतो असं वाटतं का? मात्र, आता संशोधनातून समोर आलंय की हे शब्द तुमचे पाळीव श्वानही समजतात! (फोटो सौजन्य : Pexels)
-
MRI स्कॅनमधून धक्कादायक निष्कर्ष संशोधकांनी श्वानांच्या मेंदूवर MRI स्कॅनच्या माध्यमातून अभ्यास केला. यामध्ये दिसून आलं की जेव्हा त्यांना परिचित शब्द ऐकवले गेले, तेव्हा त्यांच्या मेंदूतील विशिष्ट भाग सक्रिय झाला. (फोटो सौजन्य : Pexels)
-
केवळ आवाज नव्हे, अर्थ समजतो संशोधनातून स्पष्ट झालं की श्वान केवळ आवाज ओळखत नाहीत, तर त्या शब्दांचा अर्थही समजून घेतात, त्यामुळे मालकाचं बोलणं त्यांना कृतीतून समजतं. (फोटो सौजन्य : Pexels)
-
काही श्वान १०० ते २०० शब्द ओळखतात संशोधनात असेही श्वान आढळले, जे १०० ते २०० शब्द ओळखू शकतात. त्यांच्या मेंदूची क्षमता ही मानवी संवाद समजण्याइतकी प्रगत आहे, हे यातून स्पष्ट होतं. (फोटो सौजन्य : Pexels)
-
रोजच्या सवयींचा मोठा प्रभाव ‘बस’, ‘चला’, ‘दे’ यांसारखे शब्द सतत वापरल्यामुळे श्वानांना त्यांचा अर्थ लक्षात राहतो. शब्द आणि कृती यांचा संबंध त्यांनी शिकून घेतलेला असतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सर्व श्वानांची समज सारखी नसते श्वानांची समज, त्यांचं प्रशिक्षण, वंश, वय आणि मालकाशी असलेल्या नात्यावर अवलंबून असते. प्रत्येक श्वान वेगळं शिकतो आणि वेगवेगळ्या प्रमाणात समजतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
योग्य पद्धतीने संवाद साधा श्वानांशी संवाद करताना स्पष्ट, ठराविक शब्द वापरणं, त्या शब्दांसोबत कृती दाखवणं आणि सातत्य राखणं आवश्यक आहे, यामुळे त्यांची समज अधिक गहन होते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
शब्द समजणारे ‘निव्वळ प्राणी’ नाहीत ही माहिती दाखवते की श्वान हे केवळ पाळीव प्राणी नसून, मानवी भावना आणि भाषा समजणारे संवेदनशील जीव आहेत. योग्य संवाद साधल्यास ते तुमच्या शब्दांनाही प्रतिसाद देतात. (फोटो सौजन्य : Pexels)

Pakistan Honour Killing : क्रूरतेचा कळस! भरदिवसा जोडप्याला घातल्या गोळ्या, ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक Video व्हायरल; कुठे घडली घटना?