-
पावसाळ्यात भेट देण्यासारखी ठिकाणं
तुम्ही या पावसाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? तर मग आता योग्य वेळ आहे. कारण- पावसाळ्यात हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एकदम सुंदर वातावरण असतं.
या दिवसांत सगळीकडे हिरवळ पसरते. छोटे-मोठे धबधबे वाहू लागतात आणि हवामानही खूपच छान वाटतं. अशा वेळी भारतातली काही ठिकाणं अधिकच सुंदर दिसतात. जर तुम्हालाही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर ही ठिकाणं नक्की पाहा… कारण- इथे पावसाची खरी मजा अनुभवायला मिळते. -
गोवा
पावसाळ्यात गोव्याचं सौंदर्य आणखीनच खुलून जातं. या ऋतूमध्ये समुद्र शांत असतो. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते आणि गर्दीही कमी असते. समुद्रकिनाऱ्यावर पावसाचा आनंद घेता येतो. तसेच जुन्या किल्ल्यांना भेट देताना गोव्याचा इतिहास आणि निसर्ग यांचा एकत्रित अनुभव घेता येतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला गेलात, तर हा एक खास आणि आठवणीत राहणारा अनुभव ठरू शकतो. -
मुन्नार
पावसाळ्यात मुन्नार खूपच सुंदर दिसतं. हिरवळीनं भरलेल्या दऱ्या, फुलांच्या बागा आणि हलक्या सरी वातावरणाला अजूनच प्रसन्न बनवतात. हे ठिकाण शांत आहे. म्हणून निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एकदम योग्य आहे. तुम्ही कुटुंबासोबत गेलात तरी इथे वेळ घालवायला खूप मजा येते -
वायनाड
वायनाड पावसाळ्यात खूप सुंदर दिसतं. घनदाट जंगलं, उंच टेकड्या व वाहणारे धबधबे सगळीकडे दिसतात. त्यामुळे हे ठिकाण एखाद्या जादुई ठिकाणापेक्षा कमी वाटत नाही. जर तुम्हाला ट्रेकिंग आणि निसर्गात फिरायला आवडत असेल, तर वायनाड तुमच्यासाठी एकदम उत्तम ठिकाण आहे.
पावसाळा इथे भेट देण्यासाठी ही सगळ्यात उत्तम वेळ मानली जाते. -
उदयपूर
उदयपूर हे एक रोमँटिक शहर आहे. जर तुम्ही पावसाळ्यात तेथे जायचा विचार करत असाल, तर जरूर जा. पावसात येथील तलाव आणि राजवाडे अजूनच सुंदर आणि रोमँटिक वाटतात. तलावावर पडणारे पावसाचे थेंब पाहताना खूप शांतता आणि सुखद अनुभव मिळतो. -
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतलं एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथील पाचगणी पॉइंट, आर्थर सीट व वेण्णा लेक यांसारखी ठिकाणं धुक्यात हरवल्याचा आभास निर्माण होतो, जी खूपच आकर्षक वाटतात. येथील थंड हवा, हिरवळ आणि थेट निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारा अनुभव मन प्रसन्न करतो. पावसात गरमागरम मका, स्ट्रॉबेरी क्रीम किंवा मसाला चहा यांचा आस्वाद घेतला की, पर्यटनाची पूर्ती झाल्याचं समाधान मिळतं.

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…