-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
“Wish you live a life devoted for the people…” या शब्दांत त्यांनी आपल्या पतीच्या जनसेवेला सलाम केला आहे.
-
अमृता फडणवीस म्हणतात, “जनतेसाठी समर्पित जीवन हेच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणते.”
-
त्यांनी पुढे, “तुमच्यावर नेहमी लोकांच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा,” अशी मंगल कामनाही व्यक्त केली आहे.
-
देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नेतृत्वगुणांसाठी आणि कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात. अमृता यांची कॅप्शनही त्याचाच गौरव करते.
-
या पोस्टमध्ये त्यांनी कुटुंबाचा एकत्रित फोटो शेअर करीत कौटुंबिक एकोपाही अधोरेखित केला आहे.
-
अमृता फडणवीस यांनी एक साधा आणि आपुलकीने भरलेला संदेश शेअर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/ इंस्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…