-
निधन
रेसलिंग आयकॉन हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने ७१ व्या वर्षी निधन झाले. २४ जुलै रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. ७१ वर्षांच्या होगनने सहा वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या. -
खाजगी आयुष्य
दरम्यान, हल्क होगन कुस्तीशिवाय त्याच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत होता. हल्क होगनची पहिल्या पत्नीचं नाव
लिंडा आहे, तर त्याने जेनिफर मॅकडॅनियलशी २०१० मध्ये दुसरं लग्न केलं होतं. -
२५ वर्षे लहान
त्याने अलीकडेच त्याच्यापेक्षा २५ वर्षे लहान मुलीशी तिसरे लग्न केले होते. -
स्काय डेली
हल्क होगनने २०२३ मध्ये स्काय डेली या तरुणीशी लग्न केले होते. स्काय ही एक योग प्रशिक्षक आहे. -
निधनानंतर स्काय म्हणाली…
दरम्यान, होगनच्या निधनानंतर स्कायने तिच्या भावना व्यक्त केल्या. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. “मी यासाठी तयार नव्हते, मी खचून गेले आहे.” असं ती म्हणाली आहे. -
तिने पुढे लिहिलं की, “त्याला काही आरोग्य समस्या होत्या पण, मला विश्वास होता की तो यावर मात करेन, मला त्याच्या क्षमता माहिती होत्या. मला वाटलेलं आमच्याकडे खूप वेळ आहे”
-
माझा टेरी
ती म्हणाली की, “हे अचानक घडलं. जगासाठी तो एक लिजेंड होता, पण माझ्यासाठी तो माझा ‘टेरी’ होता.” -
माझे हृदय
मी ज्या माणसावर प्रेम केले तो माझा जोडीदार, माझे हृदय” -
शस्त्रक्रिया
हल्क होगनवर अलीकडेच गंभीर शस्त्रक्रिया झाली होती. -
(Photos Source: sky daily/Instagram) हेही पाहा- ‘सैयारा’च्या दिग्दर्शकाची लव्ह स्टोरीही चित्रपटापेक्षा कमी नाही; ‘या’ अभिनेत्रीशी केलंय लग्न, तिच्याबरोबर सिनेमाही बनवला…

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”