-
श्रावणी सोमवार म्हणजे शंकराचा वार.
श्रावणात अनेक जण शिव मंदिरात जातात. पण, तुम्ही कधी असं मंदिर पाहिलंय का, जिथे भगवान शंकर निद्रा घेत आहेत आणि पार्वती त्यांच्या शेजारी बसलेली आहे? (फोटो-सोशल मीडिया) -
भारतात एकमेव असं मंदिर!
सुरुतपल्ली (आंध्र प्रदेश) येथील पल्लीकोंडेश्वर मंदिरात भगवान शिव निद्रा अवस्थेत आहेत. हे रूप इतर कुठेही दिसत नाही. (फोटो-सोशल मीडिया) -
मंदिराची खास वैशिष्ट्यं
हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत बांधलेलं आहे. पाच मजली राजगोपुरम आहे. ‘प्रदोष पूजा’साठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. (छायाचित्र-सोशल मीडिया) -
इथे भगवान शिव ‘पल्लीकोंडेश्वर’ म्हणून ओळखले जातात. पार्वती देवी ‘मरगतम्बीगाई’ रूपात आहेत.
भगवान शिव येथे शिवलिंग नव्हे, तर मानवी रूपात दिसतात. (फोटो-सोशल मीडिया) -
सुरुत्तपल्ली नावाची कथा
समुद्रमंथनानंतर शिवांनी विष प्राशन केलं. त्यांची तब्येत बिघडली आणि ते इथे येऊन निद्रा घेऊ लागले.
(छायाचित्र-सोशल मीडिया) -
नावामागचं अर्थपूर्ण स्पष्टीकरण
‘सुरुत्ता’ म्हणजे चक्कर येणे.
‘पल्ली’ म्हणजे विश्रांती.
हे मंदिर विजयनगर सम्राट विद्यारण्यांनी बांधलं. आता याची सुंदर पुनर्बांधणी झाली आहे. (छायाचित्र-सोशल मीडिया) -
इथूनच सुरू झाली ‘प्रदोष पूजा’
सुरुत्तपल्ली हे ते पवित्र स्थान आहे, जिथे पहिल्यांदा प्रदोष पूजा झाली.
शनिवारी प्रदोष व्रताला इथे पूजा केल्यास, भगवान शिव भक्तांचे रक्षण करतात असे मानले जाते. (छायाचित्र-सोशल मीडिया) -
अडथळे दूर करणारे शक्तिपीठ
इथे पूजा केल्याने अडकलेली प्रमोशन्स पुन्हा सुरू होतात.
लग्नातले अडथळे दूर होतात आणि नात्यांतील दुरावा कमी होतो. (छायाचित्र-सोशल मीडिया) -
मंदिरात कसे पोहोचाल?
बसने – उत्तुकोट्टई बसस्थानकापासून फक्त २ किमी.
रेल्वेने – तिरुवल्लूर स्टेशनपासून २९ किमी.
विमानाने – तिरुपती विमानतळ मंदिरापासून ७३ किमी अंतरावर.

WTC Points Table: सामना ड्रॉ होताच दोन्ही संघांना मोठा धक्का! सामन्यानंतर नेमकं काय घडलं?