-
कोल्हापुरी चप्पल म्हणजे केवळ एक पारंपरिक पादत्राण नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध हस्तकलेचं प्रतीक. या चपलांची ओळख आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. पण, जर तुम्ही शुद्ध आणि दर्जेदार कोल्हापुरी चप्पल शोधत असाल, तर देशातली ‘या’ पाच बाजारपेठा तुमच्यासाठी खास आहेत. (छायाचित्र: Wikimedia Commons)
-
कोल्हापूर – चपलांचं मूळ गावच! शाहूपुरी, भवानी मंडई व लक्ष्मी रोड हे बाजार कोल्हापुरी चप्पलसाठी खास म्हणून ओळखले जातात. येथील कारागीरांची मेहनत आणि कलाकुसर पाहण्यासारखी आहे. (छायाचित्र: Wikimedia Commons)
-
पुणे – पारंपरिकतेला ट्रेंडी टच तुळशीबाग, लक्ष्मी रोड व शनिवार पेठ येथे कोल्हापुरी चपलांचे विविध नमुने पाहायला मिळतात. येथे पारंपरिक डिझाइन्ससोबत मॉडर्न फिनिशही दिसून येतो. (छायाचित्र: Wikimedia Commons)
-
मुंबई – फॅशन स्ट्रीटपासून कुलाबापर्यंत चप्पलच चप्पल कुलाबा कॉजवे, बोरीिवली व फॅशन स्ट्रीट या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल्ससाठी चांगली मागणी असते. येथील स्टॉल्सवर कोल्हापूरहून थेट माल येतो. (छायाचित्र: Wikimedia Commons)
-
दिल्ली – महाराष्ट्राबाहेरही छाप जनपथ मार्केट, दिल्ली हाट अशा ठिकाणीही कोल्हापुरी चप्पल्स मोठ्या प्रमाणावर मिळतात. येथे येणारे पर्यटक या चप्पल्सना आवर्जून पसंती दाखवितात. (छायाचित्र: Wikimedia Commons)
-
बेंगळुरू – दक्षिणेतली कलात्मक पसंती कमर्शियल स्ट्रीट आणि ब्रिगेड रोडसारख्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. स्थानिक ग्राहक आणि पर्यटक अशा दोघांमध्येही या चप्पल्स लोकप्रिय आहेत. (छायाचित्र: pexels)
-
एकदा वापरून पाहा, वारसा हक्काची भावना कोल्हापुरी चप्पल केवळ देखणं पादत्राण नसून, ती आपल्या परंपरेशी जोडलेली एक अमूल्य भेट आहे. टिकाऊपणा, आरामदायकपणा व पारंपरिक सौंदर्य यांमुळे ‘कोल्हापुरी’ चप्पल आजही लोकांच्या पायांवर राज्य करीत आहे. (छायाचित्र: Wikimedia Commons)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”