-
मुंबई आणि आसपासच्या परिसरात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या वर्षीही ‘नयन फाऊंडेशन’ गोविंदा पथकाने मोठ्या उत्साहात आपल्या सरावाला सुरुवात केली आहे.
-
‘नयन फाऊंडेशन’ हे महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक असून, त्यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण सादर केलं आहे.
-
दृष्टी नसतानाही उत्साह, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर ‘नयन फाऊंडेशन’च्या या तरुण-तरुणींकडून मानवी थर रचण्याचा धाडसी प्रयत्न केला जात आहे.
-
‘नयन फाऊंडेशन’ची स्थापना महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे २०१० रोजी करण्यात आली. ‘लोग साथ आ गए और कारवां बनता गया…’ या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या या संस्थेनं आजवर अनेक अंध तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य केलं आहे.
-
या प्रवासात अनेक स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला. कोणी प्रशिक्षण दिलं, कोणी मार्गदर्शन केलं, तर कोणी थरात सहभागी होऊन पाठीशी उभं राहिलं.
-
सन २०१३ मध्ये ‘नयन’च्या पथकानं दहीहंडी उत्सवात पहिल्यांदा मानवी थर रचले होते.
-
‘नयन’ फाऊंडेशनचा हा उपक्रम केवळ मनोरंजन किंवा साहसापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक समावेशनाचा खरा अर्थ सांगतो.
-
या गोविंदा पथकातील दृष्टीहीन बांधवांची जिद्द पाहून, आधारिका फाऊंडेशन विशेष सहकार्य करत आहे.

अमेरिकेकडून भारतावर १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ लागू; ट्रम्प म्हणाले, ‘रशियाबरोबर व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार’