-
नांदणी (ता. शिरोळ) येथील जैन मठात (Kolhapur-Based Jain Math) हत्ती पालनाची सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे.
-
माधुरी या हत्तीणींला न्यायालयाच्या आदेशाने नुकताच पोलीस बंदोबस्तात गुजरातमधील वनतारा (Vantara, Gujarat) पशुसंग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आले.
-
वनतारा हे पशुसंग्रहालय (Radhe Krishna Elephant Welfare Trust) रिलायन्स उद्योगसमूहाचे अनंत अंबानी यांच्या मालकीचे आहे.
-
ही हत्तीण (Madhuri Elephant) ताब्यात घेण्यावरून गेले दोन आठवडे कोल्हापूर (Kolhapur) आणि नांदणी परिसरात संघर्ष सुरू होता.
-
हत्तीण ताब्यात घेण्यास आलेल्या पथकाला ग्रामस्थ, भाविकांनी जोरदार विरोध केला. या वेळी पथकावर दगडफेकीचा प्रकारही झाला.
-
अखेर पोलीस बंदोबस्तात या हत्तीणींची गुजरातला (Jamnagar, Gujarat) रवानगी झाली.
-
स्वस्तिश्री पट्टाचार्य महास्वामी यांनी हत्तिणीची पूजा केली. यावेळी मठाचे महास्वामींसह ग्रामस्थ आणि भाविकांना अश्रू अनावर झाले.
-
हत्तिणीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. साश्रूपूर्ण वातावरणात तिला निरोप देण्यात आला.
-
गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाने हत्तीणींचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
माधुरी या हत्तीणींचं गुजरातमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. (सर्व फोटो सौजन्य : वनतारा आणि कोल्हापूर पेज/इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक