-
एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची एक्स पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितले आहे की, त्याने आयआयटी पदवी किंवा एमबीएशिवाय फक्त दोन नोकरी बदलांमध्ये त्याचा पगार २६ लाखांवरून ७० लाखांपर्यंत कसा वाढवला.
-
तरुणाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “पहिली नोकरी वार्षिक २६ लाख रुपये, दुसरी नोकरी वार्षिक २८ लाख रुपये आणि तिसरी नोकरी वार्षिक ७० लाख रुपये. आयआयटी नाही, एमबीए नाही, फक्त कठोर परिश्रम केले.”
-
या एक्स पोस्टची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. पोस्टमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या फक्त आयआयटी किंवा एमबीए पदवीधरांनाच मिळतात या कल्पनेला आव्हान देण्यात आले आहे.
-
तंत्रज्ञांच्या मते, त्याच्या पगारातील वाढीमागील रहस्य केळव कठोर परिश्रम होते. एक्स युजर्सनीही यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
अनेकांना या तरुणाच्या कार्यक्षेत्राबद्दल, वाटाघाटीच्या युक्त्यांबद्दल आणि त्याच्या करिअर ग्रोथला चालना देणाऱ्या कौशल्यांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
३ ऑगस्ट २०२५ रोजी पोस्ट केलेल्या या पोस्टवर आतापर्यंत ३० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि असंख्य कमेंट्स आल्या आहेत.
-
एक्स युजर्सनी या तरुणाच्या प्रवासाचे कौतुक केले आहे, विशेषतः आयआयटी किंवा एमबीए पार्श्वभूमी नसलेल्यांसाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे.
-
एका युजरने टिप्पणी केली, “माझी पहिली नोकरी वार्षिक १.८ लाख रुपयांची होती.” तर, दुसरा एक युजर म्हणाला, “आणि भाऊ, वर्क-लाईफ बॅलेन्सचा ताण कसा आहे?”
-
काही युजर्सनी अशाच यशोगाथा शेअर केल्या, तर काहींनी म्हटले की, या पोस्टमुळे त्यांना आशा आणि प्रेरणा मिळाली. (सर्व फोटो प्रातिनिधिक: कॅनव्हा)

Nikki Haley : निकी हॅले यांचं वक्तव्य; “चीनला सूट देऊन अमेरिकेने भारताशी हितसंबंध बिघडवू नये, अन्यथा..”