-
मुंबईतील प्रसिद्ध व ऐतिहासिक गणपतींपैकी चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpoklicha Chintamani) गणपती हा एक मानाचा गणपती मानला जातो.
-
१९२० साली या (Chinchpokli Sarvjanik Utsav Mandal, Mumbai) गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.
-
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचे हे १०६ वे वर्ष (Celebrating 106th Year Of Ganeshotsav Ganesh Festival) आहे.
-
उद्या, रविवारी १७ ऑगस्ट रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडणार आहे.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी हा गणपती बाप्पा आगमनाधीश म्हणून ओळखला जातो.
-
यंदा मूर्तिकार सिद्धेश दिघोळे (कलागंध आर्ट्स, परळ) चिंचपोकळीचा चिंतामणी साकारणार आहेत.
-
चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी असते.
-
यावेळी मंडळाने सांगितले… चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन सुरू झाल्यानंतर त्याच्या मागे रुग्णवाहिका असणार त्याच्यानंतर लाईव्ह व्हिडीओची व्यवस्था असणार आहे.
-
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ टॉवर बसवले आहेत. जे पोलीस त्या ठिकाणी असतील त्याच्याबरोबर चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाचे काही कार्यकर्ते असणार आहेत.
-
पाच मेडिकल कॅम्पमध्ये दोन डॉक्टर चार नर्से असणार आहेत. यामुळे गर्दीत काही त्रास झाला तर लगेच उपचार मिळू शकतील.
-
या भव्य आगमन सोहळ्यात ७-८ अम्बुलन्स असणार आहेत.
-
चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाचे ६०० कार्यकर्ते असणार आहेत त्यांच्याबरोबर ७०० ते ८०० पोलीसदेखील असणार आहेत.
-
आपण सर्वांनी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस बांधवाना सहकार्य करावे ही विनंती केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चिंचपोकळीचा चिंतामणी अधिकृत इन्स्टाग्राम पेज)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा