-
भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णन यांची एकमताने निवड केली आहे. राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. (Photo: PTI)
-
सीपी राधाकृष्णन हे केवळ राजकारणातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही एक चॅम्पियन राहिले आहेत. त्यांनी कुठे शिक्षण घेतले आणि त्यांच्या कुटुंबाबत माहिती जाणून घेऊयात… (Photo: Indian Express)
-
दरम्यान, सीपी राधाकृष्णन यांनी दक्षिण भारतात भाजपासाठी अनेक वर्षे काम केले आहे. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपाची स्थिती कमकुवत आहे. अशा परिस्थितीत सीपी राधाकृष्णन यांना इतके मोठे पद देऊन पक्षाने या दोन्ही राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. (Photo: PTI)
-
चॅम्पियन
सी.पी. राधाकृष्णन यांना खेळांमध्ये खूप रस आहे. त्यांच्या महाविद्यालयीन काळात, त्यांना एक चांगला टेबल टेनिस खेळाडू मानले जात असे. त्यांना क्रिकेट खेळायलाही आवडते. (Photo: PTI) -
आवडते खेळ
सीपी राधाकृष्णन हे लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य आहेत. क्रिकेट आणि टेबल टेनिस व्यतिरिक्त, त्यांना धावणे आणि व्हॉलीबॉल खेळणे देखील आवडते. (Photo: PTI) -
शिक्षण
चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांनी तामिळनाडूतील तुतीकोरिन येथील व्ही.ओ. चिदंबरम कॉलेजमधून व्यवसाय प्रशासनात (बीबीए) पदवी प्राप्त केली. (Photo: Indian Express) -
कुटुंब
सीपी राधाकृष्णन यांचा जन्म १९५७ मध्ये तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात सीके पोनुस्वामी आणि के जानकी यांच्या पोटी झाला. १९८५ मध्ये त्यांनी आर सुमती यांचेशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. (Photo: Indian Express) -
राजकारणात प्रवेश
सीपी राधाकृष्णन हे त्यांच्या साध्या जीवनशैली आणि प्रामाणिक प्रतिमेसाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनात राजकारणात प्रवेश केला. राधाकृष्णन वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षापासून RSS आणि भारतीय जनसंघ सारख्या संघटनांशी संबंधित राहिले आहेत. (Photo: PTI)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख