-
भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी पंडित यांनी पुरूषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात रूढीवादी कल्पना मोडून काढल्या आहेत. जोडीदाराची फसवणूक करणाऱ्याचा हॉटेलमध्ये जाऊन मागोवा घेण्यापासून ते राजकीय मोहिमांमध्ये घुसखोरी करणे आणि कॉर्पोरेट घोटाळे उघड करणे, अशी अनेक अचंबित करणारी कामं त्यांनी करून दाखवली आहेत. (Photo: Express Archive)
-
विद्यार्थी गुप्तहेर म्हणून कारकिर्दीची सुरुवात
रजनी पंडित यांचा गुप्तहेर म्हणून प्रवास त्यांच्या महाविद्यालयीन काळातच सुरू झाला, जेव्हा त्यांनी एका वर्गमित्राला कौटुंबिक समस्या उलगडण्यास मदत केली. त्यांच्या नैसर्गिक उत्सुकतेमुळे आणि दृढनिश्चयामुळे लवकरच अशा आणखी असाइनमेंट त्यांना मिळू लागल्या आणि त्यांची गुप्तहेर म्हणून कारकिर्द सुरू झाली. (Photo: Express Archive) -
महिलांनी चालवलेली पहिली भारतीय गुप्तहेर संस्था स्थापन केली
अनेक अडथळे दूर करून रजनी यांनी १९८० च्या दशकात रजनी पंडित गुप्तहेर सेवा ही स्वतःची एजन्सी स्थापन केली. अशा व्यवसायांमध्ये महिला क्वचितच दिसत असत अशा काळात हे एक धाडसी पाऊल होते. त्यांची एजन्सी संवेदनशील आणि प्रचंड जोखीम असलेली प्रकरणे हाताळण्यासाठी अल्पावधित प्रसिद्ध झाली.(Photo: Express Archive) -
वेषभूषा करण्यात तरबेज
रजनी यांच्या सर्वात अद्वितीय वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यांचं वेषभूषा करण्यातील कौशल्य. मोलकरीण, गर्भवती महिला किंवा मानसिकदृष्ट्या बरी नसलेली व्यक्ती म्हणून काम करण्यापासून ते एखादी अधिकारी म्हणून वावरण्यापर्यंत अनेक वेश धारण करून त्या मोहिमेवर जात असत. याद्वारे त्यांनी अनेक प्रकरणं उलडगली. (Photo: Express Archive) -
७५,००० हून अधिक प्रकरणे हाताळली
रजनी यांच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, वैवाहिक विश्वासघात आणि आर्थिक फसवणूक उघड करण्यापासून ते गंभीर गुन्हे उघड करण्यापर्यंत अनेक आश्चर्यकारक प्रकरणं त्यांनी हाताळली आहेत. त्यांनी आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक प्रकरणं हाताळली आहेत. (Photo: Express Archive) -
अटकेचा सामना करावा लागला पण प्रामाणिकपणा सिद्ध झाला
२०१८ मध्ये रजनी पंडित यांना एका कथित हेरगिरी रॅकेटच्या संबंधात अटक करण्यात आली होती. तथापि, त्यांनी न्यायालयात त्यांचं निर्दोषत्व सिद्ध केलं. या प्रकरणामुळे गुप्तहेरांना त्यांच्या कामात अनेकदा येणारे धोके आणि वाद उघडकीस आले. (Photo: Express Archive) -
लेखिका म्हणून प्रसिद्ध
रजनी यांनी गुप्तहेर म्हणून कामाच्या पलीकडे, ‘माझी वाटचाल’ या मराठी पुस्तकातून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. या पुस्तकामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. कोणताही व्यवसाय आपल्या आवाक्याबाहेर नसतो, स्त्रिया कुठेही कमी नसतात हेच त्यांनी त्यांच्या कामातून सिद्ध केलं आहे. (Photo: Express Archive)

शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक