-
महरा ही संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची मुलगी आहे. रशीद अल मकतूम यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांमध्ये केली जाते. महरासह ते २६ मुलांचे वडील आहेत. महराची आई झो ग्रिगोराकोस असून ती ग्रीसची आहे. महराचे आई-वडील आता घटस्फोटीत आहेत. (Photo: Social Media)
-
शिक्षण
महराचे सुरुवातीचे शिक्षण दुबईतच झाले आहे, नंतर ती लंडनला गेली आणि तिथे तिनं आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये (International Relations) पदवी पूर्ण केली. ती ३१ वर्षांची आहे आणि यूएईमध्ये ती सामाजिक कार्यही करते. (Photo: Social Media) -
इन्स्टाग्रामवर दिला होता घटस्फोट
महराने तिच्या माजी पतीवर विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला होता. तिने गेल्या वर्षी जुलैमध्ये इन्स्टाग्रामवरच तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिला होता. तिने लिहिले होते की, “प्रिय पती, तू इतरांमध्ये व्यस्त आहेस, मी आपल्या घटस्फोटाची घोषणा करते. मी तुला घटस्फोट देते, मी तुला घटस्फोट देते. मी तुला घटस्फोट देते. काळजी घे, तुझी माजी पत्नी” (Photo: Social Media) -
लग्न
महराचं पहिलं लग्न मे २०२३ मध्ये अमिरातीचे व्यापारी आणि राजघराण्यातील शेख माना यांच्याबरोबर झालं होतं. दोघांना एक मुलगी आहे. इन्स्टाग्रामवर घटस्फोट जाहीर केल्यापासून ती वेगळी राहत होती. काही काळापूर्वी त्यांचा औपचारिक घटस्फोट झाला होता. (Photo: Social Media) -
तिला घोडेस्वारीमध्ये विशेष आवड आहे. महराने सप्टेंबर २०२४ मध्ये डिव्होर्स नावाचा परफ्यूम ब्रँडही लाँच केला होता. (Photo: Social Media)
-
त्यानंतर काही दिवसांनी फ्रेंच मोंटाना दुबईला गेला होता. तिथे महाराने त्याचे स्वागत केले. (Photo: Social Media)
-
याच दरम्यान दोघांचं डेटिंग सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. जूनमध्ये पॅरिस फॅशन वीकदरम्यान हे दोघे एकत्र दिसले होते. (Photo: Social Media)
-
कोण आहे फ्रेंच मोंटना?
फ्रेंच मोंटानाचे खरे नाव करीम खारबूच असे आहे. ‘अनफॉरगेटेबल’ आणि ‘नो स्टायलिस्ट’ या गाण्यांनी त्याला जगभरात ओळख प्राप्त करून दिली. युगांडा आणि उत्तर अमेरिकेत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या परोपकारी कामांमुळे त्याला एक वेगळी प्रतिष्ठा लाभली. फ्रेंच मोंटानाचे व्यावसायिक आणि डिझाइनर नदीम खारबूचशी लग्न झाले होते. २००७ ते २०१४ या काळात ते एकत्र होते. त्यांना १६ वर्षांचा क्रूझ खारबूच नावाचा मुलगाही आहे. (Photo: Social Media) -
(Photo: Social Media) हेही पाहा- Photos: शाहरुख, सलमान खानसह ‘हे’ मुस्लिम कलाकारही गणपतीचे भक्त; थाटामाटात साजरा करतात गणेशोत्सव…

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”