-
आजच्या काळात बहुतेक देश नफा आणि खर्चातील बचतीकडे लक्ष देतात; पण जपानने एका छोट्याशा स्टेशनमधून जगाला वेगळी शिकवण दिली. होक्काइडो द्वीपावरील क्यू-शिराताकी स्टेशन फक्त एका विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी २०१६ पर्यंत सुरू ठेवले गेले. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)
-
या स्टेशनवर प्रवाशांची संख्या नगण्य झाली होती. मालवाहतूकसुद्धा थांबली होती. त्यामुळे JR Hokkaido ने स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)
-
जेव्हा अधिकाऱ्यांना कळले की, एक हायस्कूल विद्यार्थिनी काना हराडा दररोज शाळेत जाण्यासाठी या स्टेशनवर अवलंबून आहे, तेव्हा त्यांनी स्टेशन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)
-
काना हराडासाठी हे स्टेशन म्हणजे तिच्या शिक्षणाची जीवनरेखा होती. स्टेशन बंद झाले असते, तर तिला जवळच्या दुसऱ्या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ७३ मिनिटे चालत जावे लागले असते. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)
-
स्टेशन सुरू असूनही तिचा प्रवास सोपा नव्हता. कारण- दररोज केवळ चार ट्रेन तिथे थांबत आणि त्यातील फक्त दोनच ट्रेनची वेळ तिच्या शाळेच्या वेळेशी जुळे. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)
-
मर्यादित ट्रेन सेवेमुळे काना शाळेतील इतर उपक्रमांमध्येही ती भाग घेऊ शकत नव्हती. बर्याचदा तिला क्लास संपताच धाव घ्यावी लागे. कारण- शेवटची ट्रेन चुकली, तर परतण्याचा पर्याय उरत नसे. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)
-
मार्च २०१६ मध्ये काना हराडाचे पदवीदान झाल्यानंतर आणि शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर स्टेशन कायमचे बंद करण्यात आले. आर्थिक कारणांमुळे ते बंद होणे निश्चित होते; पण तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत हा निर्णय पुढे ढकलला गेला. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)
-
जगासाठी प्रेरणादायी आदर्श
ही कहाणी फक्त रेल्वे स्टेशनपुरती मर्यादित नाही. नफ्यापेक्षा माणसाच्या गरजांना प्राधान्य दिले गेले, ही गोष्ट समाजातील खरी मूल्ये दाखवणारी ठरली. जगभरात या घटनेची चर्चा झाली आणि हा शिक्षण व मानवतेचा अनोखा आदर्श मानला गेला. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook) -
११ फेब्रुवारी १९४७ रोजी सुरू झालेले हे स्टेशन १९८७ मध्ये जपान रेल्वेचे खासगीकरण झाल्यावर JR Hokkaidoच्या अखत्यारीत आले. जुलै २०१५ मध्ये ते अधिकृतपणे बंद करण्याची घोषणा झाली आणि २५ मार्च २०१६ रोजी तेथील तेथील सेवा थांबली. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये स्टेशनचे बांधकामही हटवण्यात आले. (Photo Source: Kyū-Shirataki Station/Facebook)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…