-
भारत विविधतेने नटलेला देश आहे. समुद्रकिनारे, पर्वतरांगा, वाळवंट व तलाव या सर्वांमधून येथे निसर्गाचे अदभुत सौंदर्य अनुभवायला मिळते. त्यातही सूर्यास्ताची जादू काही वेगळीच असते. प्रवासी आणि फोटोग्राफीच्या शौकिनांनी एकदा तरी ती अनुभवायलाच हवी. मग अशी सहा सूर्यास्त स्थळे आम्ही तुमच्यासाठी खाली देत आहोत
-
कन्याकुमारी, तमिळनाडू
भारतामधील हे एकमेव असे ठिकाण आहे, जिथे तुम्ही एका ठिकाणी उभे राहून तीन समुद्रांवरील (हिंद महासागर, बंगालची खाडी व अरबी समुद्र) सूर्योदय आणि सूर्यास्त पाहू शकता. येथील देखावा अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. -
पुष्कर तलाव, राजस्थान
राजस्थानातील या पवित्र तलावावर सूर्यास्त होताना आकाश नारिंगी रंगाने उजळून निघते. त्या रंगाचे तलावातील प्रतिबिंब एक वेगळाच शांत अनुभव देते. -
राधानगर बीच, अंदमान-निकोबार बेटे
आशियातील सर्वांत सुंदर समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या या बीचवरील निळ्या पाण्यात सूर्य हळूहळू मावळताना पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. -
कच्छचे रण, गुजरात
कच्छच्या विशाल मिठाच्या रणात सूर्यास्ताचे दृश्य म्हणजे एक अप्रतिम अनुभव. विशेषत: रण उत्सवादरम्यान या ठिकाणी अनुभवलेली संध्याकाळ जादुई ठरते. -
ताजमहाल, आग्रा
पांढऱ्या संगमरवरी ताजमहालावर सूर्यास्ताचे गुलाबी व सोनेरी रंग पडलेले पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. ताजमहालाच्या मिनारांवर परावर्तित झालेले रंग मन मोहून टाकतात. -
वर्कला क्लिफ, केरळ
अरबी समुद्रावर उभ्या असलेल्या या भव्य कड्यावरून दिसणारा सूर्यास्त पाहणे ही आपल्याला नाट्यमयतेची झलक दाखवून जाते. प्रवाशांना हे ठिकाण स्वर्गीयतेचा आभास निर्माण करील असेच आहे.

ऑक्टोबरमध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांचं नशीब बदलणार! संपत्तीत प्रचंड वाढ, अचानक धनलाभ तर कमाई होईल खूप चांगली