-
Happy 75th Birthday Prime Minister Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वा वाढदिवस आहे.
-
वाढदिवसानिमित्त देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
-
आज देशभरात मोदींचा वाढदिवस साजरा केला जातो आहे.
-
केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी ते दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री होते.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अनेक वाद असले तरी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून मुक्त शिक्षण पद्धतीने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते.
-
त्यानंतर गुजरात विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्र हा विषय करून मास्टर्स पदवीही मिळवली.
-
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आई हिराबेन यांनी दिलेल्या शिकवणींची अनेकदा आठवण करून दिली आहे.
-
पंतप्रधान मोदींनी आपल्या साध्या राहणीमानाचे आणि काटकसरीच्या स्वभावाचे श्रेयही आई हिराबेन यांनाच दिले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश व जगभरातून मिळालेल्या १३०० भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव होणार आहे.
-
येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हा लिलाव चालू असेल.
-
मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम गंगा नदीच्या स्वच्छतेच्या कामासाठी वापरली जाईल. सर्व पैसे नमामि गंगे या मोहीमेसाठी दिले जातील.
-
देश व जगभरातील कुठलीही व्यक्ती या ऑनलाईन लिलावात सहभागी होऊ शकते.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या घटनेमुळे दादरमध्ये तणाव; खासदार देसाई म्हणाले, “त्या भेकडांना…”