-
वर्ष २०२५ आता शेवटच्या टप्प्यात आलंय. वर्ष संपायला अजून सुमारे तीन महिने बाकी आहेत. पण, या उरलेल्या काळात काही लोकांच्या आयुष्यात अक्षरशः उलथापालथ होणार आहे.
-
कारण- बल्गेरियात जन्मलेली जगप्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांच्या गूढ भाकितांमध्ये काही निवडक राशींचा उल्लेख आहे. या राशींच्या लोकांवर येत्या काळात पैसा, यश, कीर्ती आणि सुखाचा वर्षाव होणार असल्याचं सांगितलं जातं.
-
गेल्या अनेक दशकांत बाबा वेंगांची भाकितं एकामागोमाग एक खरी ठरत गेली. त्यामुळे त्यांचं प्रत्येक भाकीत आजही चर्चेत राहतं.
-
यंदाही त्यांच्या भाकितामुळे तीन राशींचे लोक प्रचंड उत्सुकता आणि हर्षभरीत वातावरणात वावरत आहेत. कारण- या लोकांचं भाग्य अचानक उजळणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी?
-
वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची बहुतांशी कृपा असतेच. पण, येणारे तीन महिने तर त्यांच्यासाठी अक्षरशः सुवर्णसंधी घेऊन येत आहेत. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला फळ मिळणार, पैसा व मान-सन्मान वाढणार. नवी प्रॉपर्टी, गाडी, बंगला अशी त्यांची स्वप्ने साकार होण्याचा काळ जवळ येऊन ठेपला आहे.
-
मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्याने या लोकांना अचानक संधी मिळणार आहे. त्यांना नोकरीत मोठं पद, नेतृत्वाची जबाबदारी मिळेल. व्यापाऱ्यांना अनपेक्षित नफा होईल. अचानक धनलाभ होईल आणि आयुष्याचा स्तर उंचावेल. असं यश मिळेल की, आजवर केलेल्या कष्टांची परतफेड झाल्याची जाणीव होईल.
-
कुंभ राशीच्या लोकांवर शनिदेवाची खास कृपा राहणार आहे. शनीच्या साडेसातीचा शेवट जवळ येत असल्याने जाताना शनिदेव या लोकांना वरदानातून भरघोस असे काही देऊन जाणार आहेत. करिअरमध्ये आश्चर्यचकित करणारे बदल, मोठी बढती आणि पैशाचा ओघ सुरू होईल. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल आणि जीवनात वेग व जोश जाणवेल.
-
असं म्हणता येईल की येणारे तीन महिने या तीन राशींच्या लोकांसाठी सोन्याची संधी घेऊन आले आहेत. बाबा वेंगांचं भाकीत खरं ठरलं, तर गाडी, बंगला, बँक बॅलन्स या सर्व स्वप्नांची पूर्तता होणार असून, भाग्य उजळणार हे निश्चित!
-
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.) (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“…म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही”, अमेरिकेचं नाव घेत चिदंबरम यांचा मोठा दावा