-
ज्योतिषशास्त्रात शनी देवाला न्यायाधीश मानलं जातं. ते नेहमीच जीवांच्या कर्मानुसार फळ देतात. कुणाच्या चांगल्या कर्माला ते यश व समृद्धीची भेट देतात, तर वाईट कर्म करणाऱ्याला क्षणात उद्ध्वस्त करून टाकतात.
-
इतर ग्रहांसारखे शनीही सतत गोचर करत असतात, मात्र त्यांची गती अतिशय संथ असते. साधारणपणे ते अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. राशी बदलाबरोबर ते नक्षत्रांचाही बदल करतात.
-
यंदा ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शनीदेव उत्तराभाद्रपद नक्षत्र सोडून गुरु ग्रहाच्या अधिपत्याखालील पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
-
ही युती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण गुरु आणि शनीच्या संयोगामुळे काही भाग्यशाली राशींना धनलाभ, समाजात मान-सन्मान आणि करिअरमध्ये मोठ्या संधी मिळणार आहेत. येत्या काळात या राशींच्या घरी सुख-समृद्धी ओसंडून वाहील. पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा हा नक्षत्र बदल करिअर व नोकरीच्या क्षेत्रात नवा टर्निंग पॉईंट घेऊन येणारा ठरु शकतो. बेरोजगारांना अचानक नोकरीची संधी मिळू शकते, जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित धनलाभ मिळू शकतो.
-
तूळ राशीच्या लोकांसाठी ही वेळ आनंददायी व उत्साहवर्धक ठरणार आहे. अचानक एखादी मोठी खुशखबर आयुष्यात येऊ शकते. नवीन गाडी खरेदी करण्याची संधी हाताशी येऊ शकते.
-
कुंभ राशीसाठी ऑक्टोबर महिना सुवर्णकाळ ठरु शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा व्यापारात अपेक्षित यश मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते.
-
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!