सात राज्यांतून १४७० किलोमीटरचा प्रवास करून काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ने बुधवारी सकाळी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात दाखल झाली. महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर बोदर्ली गावात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याकडे यात्रेचा ध्वज सुपूर्द केला. यानंतर मध्यप्रदेशमधून हिंदी पट्ट्यात यात्रेचा प्रवास सुरु झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुऱ्हाणपूर येथील जाहीर सभेला राहुल गांधी यांनी संबोधित केलं. तेव्हा नोटबंदी, जीएसटी, महागाई, अग्निपथ योजना, सरकारी संस्थाचे खासगीकरणावरून राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, या यात्रेत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीही कुटुंबासह बुऱ्हाणपूरमध्ये सामील झाल्या होत्या.

हेही वाचा : ५० दिवसांत नोटा बदली करुन देण्याचं पंतप्रधानांचं वचन पाळणं सरकार, RBI ला बंधनकारक नाही

राहुल गांधी म्हणाले, “नोटंबदी आणि जीएसटी ही धोरणे नाहीत, ती शस्त्रे आहेत. ही शस्त्रे लहान व्यापारी, शेतकरी, मजूर यांना मारण्यासाठी वापरली जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भारतीय सरकार आणि लष्कर यांच्यात एक पवित्र नातं होतं. पण, आता नरेंद्र मोदींच्या ‘अग्निपथ’ योजनेमुळे हे नातं तुटलं आहे. कारण, ‘अग्निपथ’ सैन्यातील मुले चार वर्षानंतर ते बेरोजगार होतील.”

हेही वाचा : “नोटबंदी बेकायदेशीर होती” चार न्यायमूर्तींपेक्षा जस्टिस नागारत्नांचं वेगळं मत, जाणून घ्या आणखी काय मुद्दे मांडले?

गॅसच्या किंमती गगनाला भिडल्यावरूनही राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली. “यूपीए सरकारच्या काळत गॅसचे दर किती होते?” चार बोटे दाखल राहुल गांधी म्हणाले, “४०० रुपये. पण, आता किंमत किती रुपये आहे? दोन्ही हात वापरूनही ते दाखवू शकत नाही,” असे राहुल गांधी यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not policies but weapons say rahul gandhi in mp bharat jodo yatra ssa
First published on: 24-11-2022 at 20:06 IST