लोणावळ्यात पार्किंगच्या वादातून पर्यटकावर कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नववर्ष उजाडण्याच्या अगोदर म्हणजे ३१ डिसेंबर च्या मध्यरात्री ही घटना घडली असून लोणावळा पोलिसांनी चार जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  निरजकुमार उमाशंकर तिवारी वय- ३४ यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रोहन गायकवाड, इम्मू उर्फ इमरान शेख यांच्यासह दोन साथीदारावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- महापालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षकांना दिलासा, ४५ वर्षांवरील कामगारांना कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यात नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यटक आले होते. निरजकुमार देखील नूतन वर्षाचं स्वागत आणि सेलिब्रेशन करण्यासाठी मित्र हर्ष सोबत पोहचले होते. ३१ डिसेंबर रोजी तक्रारदार निरजकुमार यांनी त्यांची गाडी लोणावळ्यातून मॅगी पॉईंट या ठिकाणी पार्क केली होती. याच पार्किंगच्या वादातून आरोपींनी अगोदर तक्रारदार यांच्याशी हुज्जत घातली मग त्यांच्यात हाणामारी झाली. ते अंगावर कुंड्या फेकत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. घटनेत आरोपींनी तक्रारदार निरजकुमार यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या झटापटीत निरजकुमार यांचा मित्र हर्ष हा देखील जखमी झाला असून दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लोणावळा पोलिसांनी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tourist was stabbed with a knife due to a parking dispute in lonavala kjp dpj