पुणे प्रतिनिधी: हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुक २०२३ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदारांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आजी माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी रवींद्र धंगेकर यांच्या कार्याचे कौतुक केले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र धंगेकर हा लोकांच्या मनातील उमेदवार होता. तो हरहुन्नरी, लोकांना भेटणारा,पोहोचणारा आणि सर्वांशी चांगले संबध असणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत अनेक पक्षातील व्यक्तीनी त्याच काम केले आहे. तसेच आजपर्यंतच्या ७५ वर्षाच्या इतिहासात विधिमंडळात लोणार समाजाचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे आमदार रवींद्र धंगेकर हे ठरले आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रवींद्र धंगेकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

आणखी वाचा-पुणे : रिक्षाचालकाला दमदाटी करुन रिक्षा चोरली, भवानी पेठेतील घटना

यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सर्व्हे केला होता. त्यावेळी दोन्ही जागेवरील सर्व्हे पॉझिटिव्ह आले होते. पण उमेदवार योग्य द्या अस सांगण्यात आल होतं. चिंचवड निवडणुकीत राहुल आणि नानामध्ये एक वाक्यता करण्यात कमी पडलो. त्यामुळे त्या दोघांची मत निवडून आलेल्या उमेदवारा पेक्षा दहा हजारांनी जास्त होती. ही बाब मतमोजणी वेळी सर्वांच्या लक्षात आली असल्याच त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील सरकारने एवढी ताकद लावली की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाण मांडून होते. अनेक बैठका, रोड शो घेतले. तसेच त्यावेळी दोन्ही मतदारसंघात बाहेरची यंत्रणा लावल्याचे पाहण्यास मिळाल असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-ईडी विरोधात न्यायालयामध्ये धाव घेणार: सुषमा अंधारे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची १४ मे रोजी पुण्यात सभा होणार: अजित पवार

चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील महा विकास आघाडीच्या उमेदवारना मिळालेली मत लक्षात घेता. यापुढील काळात देखील याही पेक्षा चांगल काम कराव लागणार असून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभा विभागीय घेतल्या जाणार आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा १४ मे रोजी पुण्यात होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar appreciate ravidra dhangekar svk 88 mrj